पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वोच्च न्यायालय येथे आयोजित “कायदेशीर मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (एनएएलएसए) तयार केलेल्या कम्युनिटी मेडीएशन ट्रेनिंग मोड्यूलच्या कार्याची सुरुवात करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील.
एनएएलएसए ने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये कायदेविषयक मदत बचाव सल्लागार प्रणाली, पॅनेल वकील, निम-कायदेशीर स्वयंसेवक, स्थायी लोक अदालती तसेच कायदेविषयक सेवा देणाऱ्या संस्थांच्या वित्तीय व्यवस्थापनासारख्या कायदेविषयक सेवा चौकटीच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत विचारविनिमय होईल.


