पंतप्रधान  नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

हा कार्यक्रम  आदरणीय जैन आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक आचार्य विद्यानंद जी महाराज यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त सरकारद्वारे भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित वर्षभर चालणाऱ्या  राष्ट्रीय श्रद्धांजलीची समारंभाची औपचारिक सुरुवात आहे.  वर्षभर चालणाऱ्या या समारंभात देशभरात सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा समावेश असेल, ज्याचा उद्देश आचार्य विद्यानंद जी महाराज यांचे  जीवन आणि वारशाचा उत्सव साजरा करणे आणि त्यांच्या संदेशाचा प्रसार करणे आहे.

आचार्य विद्यानंद जी महाराज यांनी जैन तत्वज्ञान आणि नीतिमत्तेवर  50 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी भारतातील प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच  विशेषतः प्राकृत, जैन तत्वज्ञान आणि अभिजात  भाषांमध्ये शिक्षणासाठी काम केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities

Media Coverage

How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026