पंतप्रधान तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी व राष्ट्रार्पण 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता दूरस्थ पद्धतीने करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम-थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन व गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट, मनाली हे राष्ट्राला अर्पण करतील. तसेच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.

या प्रकल्पांमुळे लक्षणीय सामाजिक आर्थिक लाभ होतील व देशाची उर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होईल. तामिळनाडूचे राज्यपाल व मुख्यमंत्री व केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रीही या समारंभाला उपस्थित असतील.

प्रकल्पाची माहिती

एन्नोर-थिरुवल्लूर-बंगळुरू-पुद्दुचेरी- नागापट्टनम- मदुराई-तुतीकोरीन यामधील रामनाथपुरम-थूथुकुडी विभागात (143 किमी) 700 कोटी रुपये खर्चून गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. यामुळे ONGC वायू क्षेत्रातून नैसर्गीक वायू घेणे व उद्योग तसेच व्यावसायिक ग्राहकांना कच्चा माल म्हणून पुरवणे शक्य होईल.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे गॅसोलीन डीसल्फरायझेशन युनिट (CPCL), मनाली 500 कोटी रुपये खर्चून उभारले आहे. त्यातून लो सल्फर ( 8 ppm पेक्षा कमी), पर्यावरणस्नेही गॅसोलिन यांचे उत्पादन होईल.

नागापट्टणम येथील कावेरी खोरे तेलशुद्धीकरण कारखाना हा वार्षिक 9 दशलक्ष मेट्रिक टनाची क्षमता असलेला कारखाना आहे. IOCl व CPCL च्या संयुक्त भागीदारीत उभारलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत 31,500 कोटी रुपये आहे. BS-VI नियमांनुकुल स्पिरिट व डिझेलचे उत्पादन येथे होईल व त्याशिवाय पॉलिप्रोपीलीनचेही उत्पादन घेता येईल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Centre hikes MSP on jute by Rs 315, promises 66.8% returns for farmers

Media Coverage

Centre hikes MSP on jute by Rs 315, promises 66.8% returns for farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2025
January 23, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Celebrate India’s Heroes