“समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास” ही परिषदेची संकल्पना आहे
जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी होणार या परिषदेत सहभागी

दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी  सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचा विषय आहे-“ समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास”. बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत  जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व आणि विद्वान यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याच्या आणि एकत्रितपणे त्यावर तोडगे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन घडामोडींमध्ये कशा प्रकारे प्रेरक आणि मार्गदर्शक ठरू शकतात यावर शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि ते जागतिक मुद्यांवर चर्चा करतील आणि त्याबाबत सार्वत्रिक मूल्यांवर आधारित असलेल्या बौद्ध धम्मामध्ये उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. ही चर्चा प्रामुख्याने चार विषयांवर आयोजित करण्यात येईल. पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्वतता, नालंदा बुद्धिस्ट परंपरेचे जतन, बौद्ध धम्म तीर्थयात्रा, परंपरागत वारसा आणि बुद्धांचे अवशेषः दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियायी देशांशी भारताच्या अनेक शतके प्राचीन सांस्कृतिक संबंधांचा एक मजबूत पाया.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report

Media Coverage

EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मे 2026
May 08, 2026

Nari Shakti to National Security: One Vision, a Thousand Victories Under PM Modi