भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद पंतप्रधान @AlboMP. ऑस्ट्रेलिया दिनानिमित्त आपल्याला आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीपूर्ण लोकांना शुभेच्छा."

नेपाळच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"@cmprachanda जी आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद!"

भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"@PMBhutan डॉ. लोटे शेरिंग आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद! दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धीसाठी भूतानबरोबरच्या आगळ्या वेगळ्या भागीदारीसाठी भारत वचनबद्ध आहे.”

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"राष्ट्राध्यक्ष @ibusolih, आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद. समान लोकशाही मूल्यांच्या आधारे भारत-मालदीव भागीदारीने साधलेली शाश्वत प्रगती पाहून आनंद वाटत आहे."

इस्रायलच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पंतप्रधान @netanyahu.आपली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल अशी आशा आहे."

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रिय मित्र @EmmanuelMacron, आपण दिलेल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे.

भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या यशासाठी आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्षानिमित्त एकत्र काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मी पुरस्कार करतो. भारत आणि फ्रान्स जागतिक कल्याणाची ताकद आहेत.”

मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"धन्यवाद, पीएम @KumarJugnauth. आधुनिक प्रजासत्ताक म्हणून आपल्या सामायिक वाटचालीत, दोन्ही देश लोककेंद्रित विकासाचे जवळचे भागीदार आहेत. मॉरिशसबरोबरची आपली दीर्घकालीन भागीदारी नवी उंची गाठेल अशी आशा आहे.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026