नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील हा एक निर्णायक क्षण असल्याचे सांगत देशातील 140 कोटी नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले.

हा केवळ कायदा नाही तर ज्या असंख्य महिलांनी आपला देश घडवला त्यांना मानवंदना आहे आणि त्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे ऐकला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठीचे एक ऐतिहासिक पाऊल आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान आपल्या एक्स संदेशात म्हणाले: 

“आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील एक निर्णायक क्षण!  140 कोटी भारतीयांचे अभिनंदन.

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे मी आभार मानतो. असा एकमुखी पाठिंबा खरोखरच आनंददायी आहे.

संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झाल्यामुळे, आपण भारतातील महिलांसाठी मजबूत प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरणाच्या युगाची सुरुवात करत आहोत.  हा केवळ कायदा नाही;  ज्या असंख्य महिलांनी आपले राष्ट्र घडवले त्यांना ही मानवंदना आहे.  त्यांच्या चिकाटी आणि योगदानामुळे भारत समृद्ध झाला आहे.

आपण आज हा आनंद साजरा करत असताना, आपल्या देशातील सर्व महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि अदम्य भावनेचे  आपल्याला स्मरण होत आहे. त्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे ऐकला जाईल हे सुनिश्चित करण्यासाठीचे हे ऐतिहासिक पाऊल एक वचनबद्धता आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Tractor sales cross 10 lakh mark in FY26 on strong rural demand, GST cut

Media Coverage

Tractor sales cross 10 lakh mark in FY26 on strong rural demand, GST cut
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 एप्रिल 2026
April 12, 2026

Trust, Technology & Transformation: How India is Building a Viksit Bharat Under PM Modi