नेपाळमध्ये अलिकडेच झालेल्या निदर्शनांमध्ये झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
नेपाळमधील शांतता, स्थिरता आणि लोकांच्या प्रगतीसाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

कार्की त्यांच्या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि केंद्र सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.

नेपाळमध्ये अलिकडेच झालेल्या निदर्शनांमध्ये झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये असलेले विशेष संबंध वृद्धिंगत करण्यासाठी जवळून काम करत राहण्याची भारताची तयारी  असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच नेपाळ मधील जनतेच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या नेपाळच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल असे ते म्हणाले.

नेपाळला दर्शवलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या पंतप्रधानांच्या इच्छेला दुजोरा दिला.

पंतप्रधानांनी नेपाळच्या आगामी राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's crude supply secure, LPG production increased: Hardeep Puri

Media Coverage

India's crude supply secure, LPG production increased: Hardeep Puri
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 मार्च 2026
March 13, 2026

Resilient India Under PM Modi: Diplomatic Mastery, Youth Power, and Unstoppable Progress