पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनशी संबंधित अलीकडील घडामोडींबद्दल आपले विचार मांडले.
पंतप्रधानांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे आभार मानले आणि संघर्षावर शांततामय तोडगा निघावा तसेच लवकरात लवकर शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांप्रति भारताच्या खंबीर आणि सातत्यपूर्ण भूमिकेला दुजोरा दिला. या संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी भारत-युक्रेन द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांमध्ये कायम संपर्कात राहण्याबाबत सहमती झाली.
Thank President Zelenskyy for his phone call today. We exchanged views on the ongoing conflict, its humanitarian aspect, and efforts to restore peace and stability. India extends full support to all efforts in this direction. @ZelenskyyUa
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2025




