पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथहून बडोद्याला जात असताना विमानातून टिपलेले सोमनाथ मंदिराचे एक खास छायाचित्र सर्वांबरोबर सामायिक  केले आहे. प्रभास पाटणच्या समुद्रकिनाऱ्यावर दिमाखात उभे असलेले सोमनाथ मंदिर हे भक्ती, इतिहास आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे देदीप्यमान प्रतीक असल्याचे मोदी यांनी म्हणले आहे. या शाश्वत मंदिराने अमानुष हल्ले, आक्रमणे आणि शतकांचा काळ सोसला असूनही ते आजही तितक्याच भक्कमतेने उभे आहे. सोमनाथ प्रत्येक भारतीयाला शक्ती, धैर्य आणि नवी आशा देण्याचे कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.

समाज माध्यम ‘एक्स’ वरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,

सोमनाथहून बडोद्याला जात असताना हे छायाचित्र टिपले. प्रभास पाटण इथल्या सागरी  किनारी वसलेले सोमनाथ मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि आपल्या संस्कृतीच्या चैतन्याचे तेजस्वी प्रतीक आहे. रानटी हल्ले, परकीय आक्रमणे आणि शतकानुशतके उलटून गेल्यानंतरही हे मंदिर अजरामर राहिले आहे. हे मंदिर शाश्वत आहे. सोमनाथ प्रत्येक भारतीयाला सामर्थ्य, धाडस आणि उमेद देते. हर हर महादेव!"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report

Media Coverage

India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2026
July 20, 2026

Yuva to Global Stage: How PM Modi’s Policies Are Turning India’s Youth, Farms & Factories into Growth Engines