5 वी बिमस्टेक शिखर परिषद

Published By : Admin | March 30, 2022 | 10:00 IST

बिमस्टेकचे विद्यमान अध्यक्षपद भूषवत असलेल्या श्रीलंकेने आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या 5 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  भाग घेतला.

5 व्या बिमस्टेक शिखर परिषदेपूर्वी, 28 आणि 29 मार्च रोजी कोलंबोमध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने वरिष्ठ अधिकारी आणि परराष्ट्र मंत्री स्तरावरील पूर्व तयारी संबंधी बैठका झाल्या.

शिखर परिषदेची संकल्पना “एक  लवचिक प्रदेश,  समृद्ध अर्थव्यवस्था, निरोगी जनतेच्या  दिशेने, ” अशी असून  सदस्य राष्ट्रांची सध्याची  प्राधान्ये आणि कोविड-19 च्या  आर्थिक आणि विकास संबंधी परिणामांना सामोरे जाण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या कार्यक्रमांना बळ देणारे सहकार्य उपक्रम  विकसित करण्याचा बिमस्टेकचा  प्रयत्न आहे. शिखर परिषदेचे मुख्य फलित बिमस्टेक घोषणापत्राचा  स्वीकारआणि त्यावर स्वाक्षरी असून यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारी असलेल्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या सदस्य राज्यांनी बनलेल्या संघटनेला  औपचारिक मान्यता मिळाली आहे.

शिखर परिषदेत बिमस्टेक  कनेक्टिव्हिटी कार्यक्रमात नेत्यांद्वारे ‘वाहतूक  कनेक्टिव्हिटीसाठी बृहत आराखड्याला ’ मान्यता देऊन लक्षणीय प्रगती झाली  . आहे यामुळे  भविष्यात या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांसाठी  ही मार्गदर्शक चौकट उपयुक्त ठरेल.

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी बिमस्टेकच्या वाढती प्रादेशिक संपर्क व्यवस्था , सहकार्य आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले आणि या संदर्भात अनेक सूचना केल्या. बिमस्टेक -सदस्य देशांमधील संपर्क, समृद्धी आणि सुरक्षिततेच्या सेतू म्हणून  बंगालच्या उपसागराचे रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सहकारी नेत्यांना केले.

पंतप्रधान मोदींसह इतर नेत्यांच्या समक्ष तीन बिमस्टेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या ,जे  सध्याच्या सहकार्य प्रकल्पामधील प्रगतीचे प्रतिनिधित्व करतात: (i) गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्याबाबत बिमस्टेक करार; (ii) बिमस्टेक  सामंजस्य करार आणि (iii) बिमस्टेक तंत्रज्ञान हस्तांतरण सुविधेच्या स्थापनेबाबत सहकार्य करार

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
During Diplomatic Dinners to Hectic Political Events — Narendra Modi’s Austere Navratri Fasting

Media Coverage

During Diplomatic Dinners to Hectic Political Events — Narendra Modi’s Austere Navratri Fasting
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 6 ऑक्टोबर 2024
October 06, 2024

PM Modi’s Inclusive Vision for Growth and Prosperity Powering India’s Success Story