Situation in Karnataka and Tamil Nadu, as fallout of the issue of distribution of the waters of the Cauvery River, is distressful: PM
Violence cannot provide a solution to any problem. In a democracy, solutions are found through restraint and mutual dialogue: PM
Violence and arson seen in the last two days is causing loss to the poor, and to our nation’s property: PM Modi
I appeal to the people of Karnataka and Tamil Nadu, to display sensitivity, and also keep in mind their civic responsibilities: PM

माझे बंधु आणि भगिनी यांस,

कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये उद्‌भवलेली परिस्थिती अतिशय दु:खद आहे.

या घडामोडींचे मला व्यक्तिश: दु:ख झाले आहे. हिंसा हे कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. लोकशाहीमध्ये संयम आणि परस्पर चर्चेच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचे समाधान शक्य आहे.

कायद्याच्या कक्षेत राहून या वादावर तोडगा काढता येईल. त्यासाठी कायदा मोडणे, हा उपाय नाही. गेल्या दोन दिवसात सुरू असलेली हिंसा आणि जाळपोळीमुळे केवळ गरीबांचे नुकसान झाले आहे, आपल्या देशाच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे.

आजतागायत देशावर कधीही विपरित परिस्थिती ओढवली असता देशातील इतर नागरिकांप्रमाणेच कर्नाटक आणि तमिळनाडूमधील नागरिकांनीही संवेदनशीलतेचे यथार्थ दर्शन घडविले आहे. दोन्ही राज्यांमधील नागरिकांनी संवेदनशीलपणे वागावे आणि आपल्या नागरी कर्तव्यांचे स्मरण करावे, असे मी आवाहन करतो.

आपण देशहीत आणि देशनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य द्याल आणि हिंसा, तोडफोड आणि जाळपोळ करण्याऐवजी संयम, सद्‌भावना आणि समाधानाला प्राधान्य द्याल, असा विश्वास मला वाटतो.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The great tech rebound: India's white-collar job market surges 12% in Feb

Media Coverage

The great tech rebound: India's white-collar job market surges 12% in Feb
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
March 05, 2026

Prime Minister Narendra Modi will share 'Mann Ki Baat' on Sunday, March 29th. If you have innovative ideas and suggestions, here is an opportunity to directly share it with the PM. Some of the suggestions would be referred by the Prime Minister during his address.

Share your inputs in the comments section below.