पंतप्रधान मित्सोताकिस यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दोन्ही नेत्यांनी भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठीच्या भागीदारीला आणखी बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम रुप देण्यासाठी पंतप्रधान मित्सोताकिस यांनी दिला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ग्रीसचे पंतप्रधान महामहीम किरियाकोस मित्सोताकिस यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान मित्सोताकिस यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या 17 सप्टेंबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, जहाजबांधणी, संरक्षण, सुरक्षा, संपर्कव्यवस्था आणि दोन्ही देशांमधील जनतेचे परस्परसंबंध यांसारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींचे स्वागत केले आणि भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

पंतप्रधान मित्सोताकिस यांनी परस्परांना फायदेशीर असलेल्या भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या प्रक्रिया  लवकर पूर्ण करण्यासाठी आणि 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित होणाऱ्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या यशासाठी ग्रीसचा पाठिंबा व्यक्त केला.

त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय केला.

दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth