देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणारी आणि सुलभपणे उपलब्ध होणारी आरोग्यसेवा मिळण्याची सुनिश्चिती करण्याप्रती सरकारच्या अढळ कटिबद्धतेचा पंतप्रधानांनी आज पुनरुच्चार केला. जनौषधी केंद्रे तसेच आयुष्मान भारत सारख्या परिवर्तनकारी उपक्रमांच्या आधारावर सरकारने आता #NextGenGST सुधारणांच्या रूपाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
एक्स मंचावर डॉ.सुमित शाह यांनी लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी लिहितात:
“प्रत्येक भारतीयाला परवडणारी आरोग्यसेवा पुरवणे हे नेहमीच आमचे ध्येय राहिले आहे.
जनौषधी केंद्रांपासून आयुष्मान भारत उपक्रमापर्यंत आणि आता इतर अत्यावश्यक वैद्यकीय उत्पादनांवर कमी केलेल्या जीएसटीसह,ज्यामध्ये 33 प्रकारच्या जीवन-रक्षक औषधांवरील शून्य कराचा समावेश आहे यासह आपण दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सहजतेने उपलब्ध आणि परवडणारी होण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरु ठेवत आहोत.
#NextGenGST”
Affordable healthcare for every Indian has always been our mission.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2025
From Jan Aushadhi Kendras to Ayushman Bharat, and now with reduced GST on essential health products, including zero tax on 33 life-saving medicines, we continue our journey to make quality healthcare more… https://t.co/7hL5zG3bBs


