पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कल्याणकारी विकासासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेची पुष्टी केली. लोककल्याणाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्री केली जात आहे. सरकारच्या उपक्रमांचा प्रभावीपणा आणि ते उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविले जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ‘एक्स’वरच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:
“ही एक प्रशंसनीय वाढ आहे, त्यावरून लोकांच्या विकासासाठी आमची वचनबद्धता दिसून येते आणि आमच्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याची सुनिश्चिती होते”.
This is a commendable rise, indicating our commitment towards welfare-driven development and ensuring our various pro-people schemes reach maximum number of people. https://t.co/pxVNxXf51k
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2025


