जनऔषधी दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना उच्च दर्जाची, परवडणारी औषधे पुरवण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त भारत सुनिश्चित केला जाऊ शकेल असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर वर सामायिक केले की;
"#JanAushadhiDiwas हा निरोगी आणि तंदुरुस्त भारत सुनिश्चित करून लोकांना उच्च दर्जाची आणि परवडणारी औषधे पुरवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हा थ्रेड या दिशेने टाकलेल्या पावलाची व्याप्ती दर्शवते."
#JanAushadhiDiwas reflects our commitment to provide top quality and affordable medicines to people, ensuring a healthy and fit India. This thread offers a glimpse of the ground covered in this direction… https://t.co/2oUskQvrda
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2025


