राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा आजही भारतीयांना स्फूर्ती आणि वीरश्रीने भारून टाकते, पंतप्रधानांनी म्हटले आहे. मातृभूमीच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे बलिदान, याचा या कृतज्ञ राष्ट्राला कदापि विसर पडणार नाही- असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
एक्स या समाजमाध्यमवरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:
"भारतमातेच्या अमर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली! पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा आजही भारतीयांना स्फूर्ती आणि वीरश्रीने भारून टाकते. मातृभूमीच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे बलिदान, याचा या कृतज्ञ राष्ट्राला कदापि विसर पडणार नाही."
मां भारती की अमर वीरांगना रानी लक्ष्मीबाई को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आजादी के पहले संग्राम में उनकी वीरता और पराक्रम की कहानी आज भी देशवासियों को जोश और जुनून से भर देती है। मातृभूमि के स्वाभिमान की रक्षा के लिए उनके त्याग और संघर्ष को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं…
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2025




