पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आधुनिक अभियांत्रिकी परिदृश्याचा पाया रचण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांना अभियंता दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
ज्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने भारताच्या अभियांत्रिकी परिदृश्यावर एक अमीट ठसा उमटवला अशा सर एम. विश्वेश्वरय्या यांना आजच्या अभियंता दिनानिमित्त मी आदरांजली वाहत आहे. आपल्या सर्जनशीलता आणि दृढ निश्चयातून नाविन्यपूर्णतेला चालना देत राहणाऱ्या आणि विविध क्षेत्रांमधील कठीण आव्हानांना तोंड देणाऱ्या सर्व अभियंत्यांना आजच्या दिवशी मी हार्दिक शुभेच्छा देतो. विकसित भारताची निर्मिती करण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आपले अभियंते सदैव महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहतील.”
Today, on Engineers’ Day, I pay homage to Sir M. Visvesvaraya, whose brilliance left an indelible mark on India’s engineering landscape. I extend warm greetings to all engineers who, through their creativity and determination, continue to drive innovation and tackle tough…
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2025


