संत कबीर दास यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. सामाजिक सलोखा आणि सुधारणा यासाठी संत कबीर यांनी आपले आयुष्य वेचले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
''सामाजिक समरसतेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संत कबीरदास यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझे कोटी कोटी नमन. त्यांच्या दोह्यांमधले शब्द साधे आहेत तर भाव मनावर ठसणारे आहेत. म्हणूनच आजही भारतीय जनमानसावर त्याचा अमीट प्रभाव आहे. समाजातल्या चुकीच्या चालीरिती दूर करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कायम श्रद्धापूर्वक स्मरण केले जाईल.''
सामाजिक समरसता के प्रति आजीवन समर्पित रहे संत कबीरदास जी को उनकी जयंती पर मेरा कोटि-कोटि नमन। उनके दोहों में जहां शब्दों की सरलता है, वहीं भावों की प्रगाढ़ता भी है। इसलिए आज भी भारतीय जनमानस पर उनका गहरा प्रभाव है। समाज में फैली कुरीतियों को दूर करने में उनके योगदान को हमेशा… pic.twitter.com/5d7ArARMHH
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2025


