पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य संग्रामातील महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बंधू-भगिनींच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा त्याग आणि समर्पण देशातील लोकांना प्रेरणा देत राहील.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"स्वातंत्र्य संग्रामातील महान नायक भगवान बिरसा मुंडा जी यांना बलिदान दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी आदिवासी बंधू-भगिनींच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा त्याग आणि समर्पण देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहील."
स्वतंत्रता संग्राम के महानायक भगवान बिरसा मुंडा जी को उनके बलिदान दिवस पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आदिवासी भाई-बहनों के कल्याण और उनके अधिकारों की रक्षा के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित कर दिया। उनका त्याग और समर्पण देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/IU2wiFhhqO
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2025


