शेअर करा
 
Comments
कोरोना काळातल्या अभूतपूर्व सेवेबद्दल महिला बचत गटांचे केले कौतुक
सर्व भगिनींना आपल्या गावांचे नाते समृद्धी आणि संपन्नतेशी जोडता यावे याकरता वातावरण आणि परिस्थीती निर्माण करण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न - पंतप्रधान
भारतात निर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्याबाबत बचत गटांची मोठी क्षमता : पंतप्रधान
पंतप्रधानांनी 4 लाखापेक्षा अधिक बचत गटांसाठी 1,625 कोटी रुपयांचा निधी केला जारी.

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज " आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद" या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

याप्रसंगी, देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथा मांडणाऱ्या संग्रहाचे आणि शेती आधारीत जीवनशैलीबाबतच्या पुस्तिकेचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालया अंतर्गत, पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेज, पीएमएफएमई योजनेत 7,500 बचत गट सदस्यांना 25 कोटी रुपयांचे बीज भांडवल , तर या मोहिमेद्वारे, 75 शेतकरी उत्पादक संघटनांना 4.13 कोटी रुपयांचा निधीही पंतप्रधानांनी जारी केला.

केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री, श्री गिरीराज सिंह; केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री पशुपती कुमार पारस; राज्य-ग्रामीण विकास मंत्री, साध्वी निरंजन ज्योती आणि श्री फग्गन सिंह कुलस्ते; राज्यमंत्री - पंचायती राज, श्री कपिल मोरेश्वर पाटील आणि राज्यमंत्री - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, श्री प्रल्हाद सिंह पटेल, यावेळी उपस्थित होते.

कोरोना काळातल्या अभूूतपूर्व सेवेबद्दल महिला बचत गटांचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.

मास्क आणि सॅनिटायजर बनवणे असो किंवा गरजूंना अन्न पुरवणे. सोबतीनेच या महिलांनी केलेल्या जनजगागृतीच्या असामान्य कामाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

महिलांमध्ये उद्योजकतेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानात अधिक सहभागाच्या दृष्टीने, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज 4 लाखांहून अधिक बचत गटांना मोठे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. बचत गट आणि दीन दयाल अंत्योदय योजनेने ग्रामीण भारतात एक नवीन क्रांती आणली आहे असे ते म्हणाले. महिला बचत गटांची ही चळवळ गेल्या 6-7 वर्षात तीव्र झाली आहे. देशभरात आज 70 लाख बचत गट आहेत, आधीच्या तुलनेत गेल्या 6-7 वर्षांत बचत गटांच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या सरकारच्या आधीच्या काळात कोट्यावधी बहिणींचे बँक खातेच नव्हते, त्या बँकिंग व्यवस्थेपासून कोसो दूर होत्या. म्हणूनच सरकारने जन धन खाती उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की आज 42 कोटींहून अधिक जनधन खाती आहेत त्यापैकी जवळजवळ 55% खाती महिलांची आहेत. बँकांकडून कर्ज घेणे सोपे व्हावे यासाठी बँक खाती उघडली असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने राष्ट्रीय आजीविका अभियानाअंतर्गत भगिनींसाठी दिलेली मदत  आधीच्या सरकारच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे असे पंतप्रधान म्हणाले.

बचत गटांना सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे कर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या 7 वर्षांत बचत गटांनी बँकांना परतफेड करण्याचे मोठे काम केले आहे. एक काळ असा होता जेव्हा 9% च्या आसपास बँकांची कर्ज थकीत होती.  आता ते प्रमाण 2-3 % वर आले आहे. त्यांनी बचत गटातील महिलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

बचत गटांना उपलब्ध असलेल्या विनाहमी कर्जाची मर्यादा दुप्पट करून 20 लाख रुपये केली आहे. तुमचे बचत खाते, कर्ज खात्याशी जोडण्याची अटही दूर केली आहे. अशा अनेक प्रयत्नांमुळे तुम्ही आता स्वावलंबनाच्या मोहिमेत अधिक उत्साहाने पुढे जाऊ शकाल असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण पदार्पण केले आहे. नवीन ध्येये निश्चित करण्याची आणि नवीन उर्जा घेऊन पुढे जाण्याची ही  वेळ आहे. भगिनींच्या सामूहिक शक्तीनेही आता नव्या ताकदीने पुढे जायचे आहे. सर्व भगिनींना आपल्या गावांचे नाते समृद्धी आणि संपन्नतेशी जोडता यावे याकरता वातावरण आणि परिस्थीती निर्माण करण्याचा सरकार  सातत्याने प्रयत्न करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

कृषी आणि कृषी आधारित उद्योगात महिला बचत गटांसाठी असंख्य संधी आहेत. बचत गटांनाही कृषी आधारीत सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी एक विशेष निधी तयार केल्याची माहीती त्यांनी दिली. सर्व सदस्य वाजवी दर निश्चित करून या सुविधांचा लाभ घेऊ शकतात आणि इतरांना भाड्यानेही देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

नवीन कृषी सुधारणांचा फायदा फक्त आपल्या शेतकऱ्यांनाच होणार नाही, तर बचत गटांसाठीही अमर्याद संधी निर्माण केल्या जात आहेत.  आता बचत गट शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करू शकतात आणि डाळींसारख्या उत्पादनांची थेट घरपोच विक्री देखील करू शकतात.

आता तुमच्या साठवणुकीवर कोणतेही बंधन नाही. थेट शेतातून उत्पादन विकणे किंवा अन्न प्रक्रिया एकक स्थापन करून उत्तम आवरणासह  ते विकणे असे पर्याय बचतगटांकडे आहेत. ऑनलाईन कंपन्यांशी करार करून, बचत गट आपली उत्पादने उत्तम पॅकेजिंसह सहजपणे शहरांमध्ये पाठवू शकतात असे त्यांनी सूचवले.

सरकार भारतात निर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देत आहे आणि यासाठी सर्वतोपरी मदतही करत आहे. विशेषत: आपल्या आदिवासी भागातील परंपरागतपणे याच्याशी संबंधित भगींनीना मदत केली जात  आहे. या क्षेत्रात बचत गटांसाठीही भरपूर क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी आजची मोहीम सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामध्ये बचत गटांची दुहेरी भूमिका आहे.  बचत गटांनी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक बद्दल जागरूकता निर्माण करावी आणि त्याच्या पर्यायासाठी काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

बचत गटांनी ऑनलाईन सरकारी ई-बाजारपेठेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. भारत आज वेगाने बदलतोय यात देशातील बहिणी आणि मुलींना पुढे जाण्याच्या संधी वाढत आहेत असे ते म्हणाले.

सर्व भगिनींना घर, शौचालय, वीज, पाणी आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत. सरकार महिला आणि मुलींच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी संवेदनशीलतेने काम करत आहे. यामुळे केवळ महिलांचा सन्मानच वाढला नाही तर मुली आणि भगीनींचा आत्मविश्वासही वाढत आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

महिला बचत गटांनी राष्ट्र उभारणीसाठीचे आपले प्रयत्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत जोडावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले.  8 कोटीपेक्षा जास्त महिला आणि मुलींच्या सामूहिक सामर्थ्याने अमृत महोत्सव नवीन उंचीवर नेला जाईल असे सांगत  सेवेच्या भावनेने कसे सहकार्य करता येईल याचा विचार करण्यास त्यांना सांगितले.

स्त्रियांसाठी पोषण आहार जागरूकता मोहीम राबवणे, कोविड -19 लसीकरण मोहीम राबवणे, त्यांच्या गावांमध्ये स्वच्छता आणि जलसंधारण इत्यादी उदाहरणे त्यांनी दिली. जवळच्या सौरउर्जा प्रकल्प, दुग्धव्यवसाय उदयोग, शेणासंबंधित प्रकल्पांना बचत गटांनी भेटी द्याव्यात आणि त्यातून उत्तम पद्धती शिकाव्यात असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

पंतप्रधानांनी बचत गटांचे कौतुक केले आणि सांगितले की अमृत महोत्सवाच्या यशाचे अमृत त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वत्र पसरेल आणि यामुळे देशाला लाभ मिळेल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
52.5 lakh houses delivered, over 83 lakh grounded for construction under PMAY-U: Govt

Media Coverage

52.5 lakh houses delivered, over 83 lakh grounded for construction under PMAY-U: Govt
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 3 डिसेंबर रोजी इनफिनिटी फोरमचे उद्घाटन करणार
November 30, 2021
शेअर करा
 
Comments
या फोरमची संकल्पना ' बियॉन्ड "या संकल्पनेवर केंद्रित असेल ; यात 'फिनटेक बियॉन्ड बाऊंडरीज', 'फिनटेक बियॉन्ड फायनान्स' आणि 'फिनटेक बियॉन्ड नेक्स्ट' यासारख्या विविध उपसंकल्पनांचा समावेश आहे

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इन्फिनिटी फोरम या  फिनटेकसंबंधी  विचारमंथनावरील  नेतृत्व मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उद्घाटन करणार आहेत.

 

गिफ्ट (GIFT) सिटी आणि ब्लूमबर्ग यांच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणने  (IFSCA) 3 आणि 4 डिसेंबर 2021 रोजी  या कार्यक्रमाचे आयोजन केले  आहे. फोरमच्या या पहिल्या बैठकीसाठी इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन  हे भागीदार देश आहेत.

 

इन्फिनिटी मंचच्या माध्यमातून   धोरण, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञ मंडळी  एकत्र येतील आणि फिनटेक उद्योगाद्वारे सर्वसमावेशक वाढीसाठी आणि  मानवतेची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाचा  कसा वापर  करता  येईल यावर चर्चा करतील.

 

या फोरमची संकल्पना ' बियॉन्ड "या संकल्पनेवर  केंद्रित आहे.  ; तसेच  'फिनटेक बियॉन्ड बाऊंडरीज'  ही  वित्तीय सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक  विकासामध्ये भौगोलिक सीमांच्या पलिकडील  बाबींवर  केंद्रित उपसंकल्पना आहे. स्पेस टेक , ग्रीन टेक , ऍग्री  टेक सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान  क्षेत्रांशी समन्वय साधणारी आणि  'फिनटेक बियॉन्ड फायनान्स' आणि क्वांटम कंप्युटिंग भविष्यात फिनटेक  उद्योगाच्या स्वरूपावर कसा प्रभाव पाडू शकतो आणि नवीन संधींना प्रोत्साहन देऊ शकेल यावर  केंद्रित  'फिनटेक बियॉन्ड नेक्स्ट' यासारख्या   विविध उपसंकल्पना  आधारल्या आहेत .

 

या मंचावर 70 पेक्षा  अधिक देशांचा सहभाग असेल. मंचावरील प्रमुख वक्त्यांमध्ये मलेशिया अर्थमंत्री तेंगकू  जफरूल अझीझ, इंडोनेशियाच्या अर्थमंत्री मुल्यानी इंद्रावती, इंडोनेशियाच्या सर्जनशील अर्थव्यवस्था मंत्री  सँडियागा एस युनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  मुकेश अंबानी, सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  मासायोशी सोन , आयबीएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. उदय कोटक ,यांचा समावेश आहे.  तसेच नीती   आयोग, इन्व्हेस्ट इंडिया, फिक्की , नॅसकॉम  हे या वर्षीच्या मंचाचे काही प्रमुख भागीदार आहेत.

 

आयएफएससीए (IFSCA )बद्दल

 

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA)चे  मुख्यालय गुजरात मधील गिफ्ट  सिटी, गांधीनगर  येथे आहे. याची   स्थापना आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण कायदा, 2019 अंतर्गत करण्यात आली आहे. ही संस्था भारतातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मध्ये आर्थिक उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्थाचा च्या विकास आणि नियमन करण्यासाठी  एकीकृत प्राधिकरण म्हणून काम करते.   गिफ्ट आयएफएससी (GIFT IFSC )हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे.