शेअर करा
 
Comments
महामारी विरुद्धच्या लढ्यात काशी आणि उत्तर प्रदेशच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
पूर्वांचल क्षेत्रासाठी काशी हे मोठे मेडिकल हब म्हणून आकारास येत आहे : पंतप्रधान
स्वच्छता, माँ गंगेचे सौंदर्य आणि काशी याच आकांक्षा आणि प्राधान्य : पंतप्रधान
या क्षेत्रात 800 कोटींच्या योजनांसाठी काम सुरू : पंतप्रधान
उत्तर प्रदेश हे देशातील गुंतवणुकीचे अग्रणी राज्य म्हणून वेगाने उदयास येत आहे : पंतप्रधान
कायद्याचे राज्य आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्याने उत्तर प्रदेशातील लोकांना योजनांचा लाभ मिळणे सुनिश्चित झाले : पंतप्रधान
कोरोना विषाणू विरोधात जागरूक राहण्याचे उत्तर प्रदेशातील नागरिकांना करून दिले स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभ संपन्न झाला. त्यांनी विविध सार्वजनिक प्रकल्पांचे आणि कामांचे उद्‌घाटन केले, यामध्ये बीएचयू अर्थात बनारस हिंदू विद्यापीठामधील 100 बेड्सची माता आणि  बाल आरोग्य विंग, गोडुलियामधील बहुस्तरीय वाहनतळ, पर्यटन विकासासाठी गंगा नदीवरील रो-रो वाहतूक नौका आणि वाराणसी गाझीपूर महामार्गावरील त्रि-स्तरीय उड्डाणपूल आदी प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प साधारण 744 कोटी रुपयांचे आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते 839 कोटी रुपयांच्या काही प्रकल्पांची आणि सार्वजनिक कामांची यावेळी पायाभरणी करण्यात आली . यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) च्या कौशल्य आणि तंत्रज्ञान  समर्थन केंद्राचा समावेश, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत 143 ग्रामीण प्रकल्प आणि कारखियाँमध्ये आंबा आणि भाज्यांचे एकात्मिक पॅक हाऊस यांचा समावेश   आहे.

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा ताकदीने गेल्या काही महिन्यांपूर्वी हल्ला केला त्या काळातील काही बिकट परिस्थितीचे स्मरण पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केले. या काळातील आव्हानांशी लढताना घेतलेल्या परिश्रमांबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकार  आणि काशी प्रशासन  यांचे कौतुक केले. महामारीच्या काळात परिस्थिती हाताळताना उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या परिश्रमांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्यांनी काशी येथील प्रशासनाचे आणि कोरोना योद्धा असलेल्या संपूर्ण पथकाचे रात्रंदिवस काम  केल्याबद्दल कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, ``अगदी कठीण दिवसांमध्ये देखील, काशी ने दाखवून दिले आहे की ते कधीच थांबत नाहीत आणि थकत नाहीत.`` यापूर्वीच जपानी इन्फेलायटीस प्रकारचे आजार जशी भिती निर्माण करीत होते, तशा प्रकारे ही दुसरी लाट हाताळावी लागली असल्याची तुलना त्यांनी यावेळी केली. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे यापूर्वी छोट्या समस्यांचे मोठ्या देखील आव्हानांत रुपांतरीत होत आज उत्तर प्रदेश हे देशातील  सर्वाधिक चाचण्या आणि लसीकरण करणारे राज्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशातील वेगाने सुधारणाऱ्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचा त्यांनी  उल्लेख केला. गेल्या चार वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या चार पटीने वाढली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालये पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. राज्यात सुरू केल्या जाणाऱ्या सुमारे 550 ऑक्सिजन प्रकल्पांबद्दल मोदी यावेळी बोलले,त्यापैकी  14 प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने बालरोग अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन सेवा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे देखील त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, की अलिकडेच जाहीर करण्यात आलेल्या 23,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची उत्तर प्रदेश सरकारला निश्चित मदत होईल. ते म्हणाले की काशी शहर हे पूर्वांचलचे एक मोठे मेडिकल हब होऊ पाहात आहे. काही उपचारांसाठी एखाद्याला दिल्ली किंवा मुंबई गाठावी लागत असे, ते उपचार देखील आता काशीमध्ये उपलब्ध आहेत असे त्यांनी असेही नमूद केले. आज उद्घाटन झालेल्या काही प्रकल्पांमुळे शहरातील वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी वाढणार आहेत.

प्राचीन काशी शहर विकासाच्या मार्गावर चालत असताना अनेक प्रकल्पहे  शहराचे प्राचीनपण सुरक्षित ठेवीत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. महामार्ग, उड्डाणपूल, रेल्वेचे उड्डाणपूल, भूमिगत वीज वाहिन्या, सांडपाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, पर्यटनाला चालना देणे यासाठी सरकारकडून अभूतपूर्व प्रयत्न सुरु आहेत. “आज घडीला , 8,000 कोटी रुपयांच्या योजनांवर काम सुरु  आहे,”अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

ते म्हणाले की, स्वच्छता,  माँ गंगेचे सौंदर्य आणि काशी  याच आकांक्षा असून  यालाच सरकारचे प्राधान्य आहे. या कामासाठी, रस्ते, सांडपाणी प्रकल्प व्यवस्थापन, उद्यानांचे आणि घाटांचे सौंदर्यीकरण अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर काम केले जात आहे. पंचकोसी मार्ग, वाराणसी गाझीपूरवरील पुलाचे विस्तारीकरण केल्यास बरीच गावे आणि लगतच्या शहरांना मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले .

शहरामध्ये सर्वत्र बसविण्यात आलेले मोठे एलईडी स्क्रीन्स आणि घाटावर लावण्यात आलेले अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे माहिती देणारे फलक  यामुळे काशीला भेट देण्यास येणाऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले. हे एलईडी स्क्रीन्स आणि माहितीचे फलक हे काशीचा इतिहास, स्थापत्य, हस्तकला, कला अशा प्रत्येक क्षेत्राची  माहिती आकर्षक स्वरूपात दर्शवेल आणि याची भाविकांना खूप मदत होईल. अशा मोठ्या स्क्रीन्सच्या मदतीमुळे माँ गंगा घाटावरील आणि काशी विश्वनाथ मंदिरातील आरतीचे प्रसारण संपूर्ण शहरामध्ये करणे शक्य होणार आहे. पंतप्रधानांनी अशीही माहिती दिली की, आज उद्घाटन झालेल्या रो – रो सेवा आणि जहाज सेवा यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि आज उद्घाटन होणाऱ्या रूद्राक्ष केंद्रामुळे शहरातील कलाकारांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ देखील उपलब्ध होणार आहे.

आधुनिक काळात काशी हे शिकण्याचे केंद्र म्हणून होत असलेल्या विकासाबद्दल देखील पंतप्रधान यावेळी बोलले. आज काशी येथे आधुनिक शाळा, आयटीआय आणि अशा अनेक संस्था आहेत. सीआयपीईटीचे कौशल्य आणि तंत्रज्ञान समर्थन केंद्र हे औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मोठे सहाय्यक  ठरणार आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील गुंतवणुकीचे अग्रणी राज्य  म्हणून वेगाने उदयास येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. काही वर्षांपूर्वी व्यवसाय करण्यास कठीण राज्य  असे उत्तर प्रदेश बाबत गृहीत धरले जात होते, तेच राज्य आज मेक इन इंडियामध्ये लोकप्रिय ठिकाण झाले आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले . अलिकडच्या काळात पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी योगी सरकारला याचे श्रेय दिले . यासाठी  मोदी यांनी संरक्षण कॉरिडोर, पूर्वांचल एक्स्प्रेस-वे, बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे, गोरखपूर लिंक एक्स्प्रेस-वे आणि गंगा एक्स्प्रेस-वे ही अलिकडील उदाहरणे दिली.

देशातील कृषी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी 1 लाख रुपयांचा विशेष निधी तयार करण्यात आला असून त्याचा लाभ आता आपल्या कृषी बाजारपेठेला देखील होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले . देशातील कृषी बाजारपेठ पद्धतीची व्यवस्था आधुनिक आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे असे त्यांनी सांगितले .

उत्तर प्रदेशातील नवीन विकास प्रकल्पांची मोठी यादी लक्षात घेता, यापूर्वीही राज्यासाठी योजना आणि वित्तीय योजना आखल्या गेल्या होत्या,  पण नंतर त्या लखनऊमध्ये अडकून पडत असत असे  पंतप्रधान म्हणाले. विकासाचे परिणाम सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची ऊर्जा आणि प्रयत्न वापरल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

आज उत्तर प्रदेशामध्ये कायद्याचे राज्य आहे , पूर्वी माफिया राज आणि दहशत जी हाताबाहेर जात होती, ती आता कायद्याच्या अंमलात आहे असे पंतप्रधान आज म्हणाले . भगिनी आणि लेकींच्या सुरक्षेबाबत पालक पूर्वी नेहमीच भितीच्या छायेखाली वावरत असत, ही परिस्थिती देखील आता बदलली आहे. आज उत्तर प्रदेशातील सरकार भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीने नव्हे, तर विकासाच्या माध्यमातून चालविले जात आहे. यामुळेच आज, उत्तर प्रदेशात जनतेला आज योजनांचा थेट लाभ मिळत आहे. यामुळेच, आज उत्तर प्रदेशात नवीन उद्योग गुंतवणूक करीत आहेत आणि रोजगाराच्या संधी येथे वाढत आहेत,असे  पंतप्रधान म्हणाले.

कोरोनाला पुन्हा त्याची ताकद वाढू न देण्याचे नागरिकांना स्मरण करून देत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशाच्या नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणूव करून दिली. सावधगिरी बाळगण्याचे प्रमाण कमी झाले, निष्काळजीपणा वाढला तर मोठ्या प्रमाणावर लाट येऊ शकते, असे सांगत त्यांनी जनतेला सावध केले. त्यांनी प्रत्येकाला नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि “सर्वांसाठी मोफत लस”या मोहिमेअंतर्गत लस घेण्याचे आवाहन केले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Modi govt's big boost for auto sector: Rs 26,000 crore PLI scheme approved; to create 7.5 lakh jobs

Media Coverage

Modi govt's big boost for auto sector: Rs 26,000 crore PLI scheme approved; to create 7.5 lakh jobs
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 सप्टेंबर 2021
September 16, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens rejoice the inauguration of Defence Offices Complexes in New Delhi by PM Modi

India shares their happy notes on the newly approved PLI Scheme for Auto & Drone Industry to enhance manufacturing capabilities

Citizens highlighted that India is moving forward towards development path through Modi Govt’s thrust on Good Governance