शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांच्या व्यापारासाठी मदत करून, त्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 6,865 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली असून प्रत्येक FPOला प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. FPOच्या सदस्यांना संघटनेच्या माध्यमातून अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर, सल्ला, वित्तपुरवठा, आणि बाजारपेठेविषयी माहिती घेणे यासारखी कामे एकत्रितपणे करता येणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होऊ शकेल. चित्रकूट, उत्तरप्रदेश येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “शेतकरी कायमच उत्पादक राहिले आहेत. मात्र FPOच्या मदतीने ते आपल्या शेतमालाचा व्यापारदेखील करू शकतील. ते पिकांची लागवड करण्याबरोबरच योग्य भाव मिळवण्यासाठी कुशल व्यापारी ही भूमिकाही निभावू शकतील. ”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom

Media Coverage

Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 11, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आचार्य विनोबा भावे यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

मोदी म्हणाले की, आपल्या विविध प्रयत्नांतून आचार्य विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे;

"आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

त्यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

आपल्या विविध प्रयत्नांतून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.