देशातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे. 2014-16 या काळात , प्रती एक लाख मातांमागे, 130 इतका असलेला हा मृत्यूदर 2018-20 मध्ये 97 प्रती लाखांपर्यंत कमी झाला आहे. याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संबंधितांचे आभार मानत, आनंद व्यक्त केला आहे. महिला सक्षमीकरणाशी संबंधित, सर्व पैलू अत्यंत मजबूत केले जात आहेत,असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडवीय यांचे ट्वीट शेअर करत पंतप्रधानांनी म्हटलं आहे, की—
“हा फार उत्साहवर्धक कल आहे. हा बदल बघून फार समाधान वाटले. महिला सक्षमीकरणाशी संबंधित सर्व पैलू अधिकाधिक बळकट करण्यावर आम्ही भर घेत आहोत”
A very encouraging trend. Happy to see this change. Our emphasis on furthering all aspects relating to women empowerment remains very strong. https://t.co/Z4yOBLMd9N
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2022


