युनेस्कोच्या (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कोळीकोड  आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, कोळीकोडच्या समृद्ध साहित्यिक वारशामुळे भारताची सांस्कृतिक गतिशीलता जागतिक पटलावर अधिक तेजाने चमकत आहे. तसेच, आपला सांगीतिक वारसा जतन करण्याची आणि तो समृद्ध करण्याची ग्वाल्हेरची वचनबद्धता अधोरेखित करून, जगभरात त्याचा प्रतिध्वनी उमटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या X समाज माध्यमावरील मेसेजला प्रतिसाद  देत पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“कोळीकोडचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि ग्वाल्हेरचा मधुर वारसा आता प्रतिष्ठेच्या युनेस्को (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समाविष्ट झाल्यामुळे भारताची सांस्कृतिक गतिशीलता जागतिक पटलावर अधिक उजळून निघाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कोळीकोड आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही मान्यता साजरी करताना, आपला देश, आपल्या वैविध्यपूर्ण  सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.

ही प्रशंसा, आपल्या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी आणि त्याची देवाण घेवाण करण्यासाठी समर्पित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सामूहिक प्रयत्न प्रतिबिंबित करते.

“ग्वाल्हेर आणि संगीताचे विशेष नाते आहे. युनेस्कोचा (UNESCO) हा सन्मान मिळणे, ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. ग्वाल्हेरने ज्या बांधिलकीने आपला सांगीतिक वारसा जपला आणि समृद्ध केला, त्याचे प्रतिध्वनी जगभरातून उमटत आहेत. माझी मनोकामना आहे की, या शहराची सांगीतिक परंपरा आणि इथल्या लोकांचा त्याबद्दलचा उत्साह आणखी वाढावा, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्यापासून प्रेरणा मिळेल.”

 

“യുനെസ്‌കോയുടെ 'സാഹിത്യ നഗരം' ബഹുമതി ലഭിച്ചതോടെ സാഹിത്യ കലയോടുള്ള കോഴിക്കോടിന്റെ അഭിനിവേശം ആഗോളതലത്തിൽ ഇടം നേടിയിരിക്കുന്നു. ഊർജ്ജസ്വലമായ സാഹിത്യ പാരമ്പര്യമുള്ള ഈ നഗരം പഠനത്തെയും കഥാകഥനത്തെയും പ്രതിനിധാനം ചെയ്യുന്നു. സാഹിത്യത്തോടുള്ള കോഴിക്കോടിന്റെ അഗാധമായ സ്നേഹം ലോകമെമ്പാടുമുള്ള എഴുത്തുകാരെയും വായനക്കാരെയും പ്രചോദിപ്പിക്കുന്നത് തുടരട്ടെ.”

“ग्वालियर और संगीत का बहुत खास रिश्ता है। UNESCO से इसे सबसे बड़ा सम्मान मिलना बहुत गर्व की बात है। ग्वालियर ने जिस प्रतिबद्धता के साथ संगीत की विरासत को संजोया और समृद्ध किया है, उसकी गूंज दुनियाभर में सुनाई दे रही है। मेरी कामना है कि इस शहर की संगीत परंपरा और उसे लेकर लोगों का उत्साह और बढ़े, ताकि आने वाली पीढ़ियों को इससे प्रेरणा मिलती रहे।”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Wed in India’ Initiative Fuels The Rise Of NRI And Expat Destination Weddings In India

Media Coverage

'Wed in India’ Initiative Fuels The Rise Of NRI And Expat Destination Weddings In India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 डिसेंबर 2025
December 15, 2025

Visionary Leadership: PM Modi's Era of Railways, AI, and Cultural Renaissance