दोन्ही नेत्यांनी भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा घेतला आढावाआणि उच्च-स्तरीय आदानप्रदान तसेच वाढत्या सहकार्याबद्दल केले समाधान व्यक्त
पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी भारताच्या जी-20 उपक्रमांची प्रशंसा केली आणि या उपक्रमांना डेन्मार्कचा संपूर्ण पाठींबा व्यक्त केला
पुढच्या वर्षी, 2024मध्ये भारत-डेन्मार्क संबंधांचा 75वा वर्धापनदिन साजरा करण्याबाबत दोन्ही नेत्यांची संमती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी मेटे फ्रेडरिक्सन यांची दुसऱ्यांदा नेमणूक झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन  केले.

दोन्ही नेत्यांनी भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.दोन्ही देशांमध्ये नुकतेच झालेले उच्च-स्तरीय आदानप्रदान तसेच वाढत्या सहकार्याबद्दल या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना भारताच्या विद्यमान जी-20 समूहाच्या अध्यक्षतेविषयी तसेच देशाच्या महत्त्वाच्या प्राधान्याक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली.पंतप्रधान फ्रेडरिकसन यांनी भारताच्या जी-20 विषयक उपक्रमांची प्रशंसा केली आणि या उपक्रमांना डेन्मार्कचा संपूर्ण पाठींबा व्यक्त केला.

पुढच्या वर्षी, 2024 मध्ये येत असलेला भारत-डेन्मार्क संबंधांचा 75वा  वर्धापनदिन योग्य पद्धतीने  साजरा करण्याबाबत तसेच दोन्ही देशांदरम्यान असलेल्या संबंधांमध्ये वैविध्य आणण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांचा शोध घेण्याबाबत दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt nod to 22 more firms under ECMS, investment worth Rs 42,000 crore

Media Coverage

Govt nod to 22 more firms under ECMS, investment worth Rs 42,000 crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जानेवारी 2026
January 03, 2026

Reclaiming Our Past, Building Our Future: PM Modi’s vision of Vikas Bhi, Virasat Bhi Reflected in India’s Development