16 एआय आणि डीपटेक स्टार्टअप्सचे सीईओ आणि संस्थापक त्यांचे विचार आणि कार्य सादर करतात
हे स्टार्ट-अप्स लोकसंख्या स्तरावर प्रमाणात परिणाम घडवून आणण्यासाठी आरोग्यसेवा, कृषी, सायबरसुरक्षा, अवकाश आणि सामाजिक सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात काम करत आहेत
पंतप्रधानांनी प्रभावी उपाययोजना विकसित करणाऱ्या नवोन्मेषकांचे कौतुक केले आणि भारताच्या गरजांनुसार उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.
शेती, पर्यावरण संरक्षण, मातृभाषेत उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी चर्चा केली.
स्टार्टअप्सनी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे कौतुक केले आणि जागतिक स्तरावर एआय विषयक चर्चांना आकार देण्यात देशाची वाढती भूमिका अधोरेखित केली.

गोलमेज बैठकीत सहभागी झालेले स्टार्टअप्स महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लोकसंख्या स्तरावरील महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देत आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रात स्टार्टअप्स प्रगत निदान, जीन थेरपी आणि कार्यक्षम रुग्ण नोंद व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करतात जेणेकरून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचवल्या जाऊ शकतील. शेतीमध्ये, ते उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच हवामान जोखीम व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी भौगोलिक आणि पाण्याखालील बुद्धिमत्तेचा वापर करतात. या गटात सायबर सुरक्षा, नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ अंतराळ, न्याय आणि शिक्षणासाठी स्थानिक भाषेची उपलब्धता, सामाजिक सक्षमीकरण आणि एंटरप्राइझ उत्पादकता बळकट करण्यासाठी वारसा प्रणालींचे आधुनिकीकरण यावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम देखील समाविष्ट आहेत. एकूणच, स्टार्टअप परिसंस्थेत स्थानिक गरजांना प्रतिसाद देत जागतिक पातळीवर एआय-आधारित नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता दिसून येते.

एआय स्टार्टअप्सनी भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला बळकट करण्यासाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या क्षेत्राच्या जलद विस्तार आणि आजवर वापरात आलेल्या प्रचंड क्षमतेवर प्रकाश टाकला, एआय नवोन्मेष आणि तैनाती यांचा जागतिक वेग आता मोठ्या प्रमाणात भारताकडे सरकत आहे हे त्यांनी लक्षात आणून दिले. भारत आता एआय प्रगतीसाठी एक सहाय्यक आणि गतिमान वातावरण उपलब्ध करून देत असून जागतिक एआय क्षेत्रात आपली ठोस ओळख निर्माण करत आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे देखील कौतुक केले. ही परिषद एआय विषयी जागतिक चर्चांना आकार देण्यात देशाच्या वाढत्या भूमिकेचे दर्शन घडवते.

पंतप्रधानांनी धाडसी जोखीम घेतल्याबद्दल आणि प्रभावी उपाय विकसित केल्याबद्दल नवोन्मेषकांचे अभिनंदन केले. शेती आणि पर्यावरण संरक्षणासारख्या विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या क्षमतेवर त्यांनी चर्चा केली, यात मातीचे आरोग्य जपण्यासाठी पीक उत्पादकता आणि खतांचा वापर यावर लक्ष ठेवणे समाविष्ट आहे. भारतीय भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी मातृभाषेत उच्च शिक्षणासाठी आपल्या एआय साधनांचा विस्तार करण्याचे आवाहन केले.

 

पंतप्रधानांनी मजबूत डेटा प्रशासनाची गरज अधोरेखित केली.ज्ञचुकीच्या माहितीविरुद्ध सावधगिरी बाळण्याचे आणि भारताच्या गरजांनुसार तयार केलेल्या उपायांचा विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. यूपीआयला साध्या आणि स्केलेबल डिजिटल नवोन्मेषाचे मॉडेल म्हणून संबोधित करताना, त्यांनी भारतीय कंपन्यांवर गाढ विश्वास व्यक्त केला आणि देशांतर्गत उत्पादनांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी अंतराळ क्षेत्रात खाजगी सहभाग वाढवण्याबद्दल देखील आपले विचार मांडले आणि भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदारांना अत्याधिक रस असल्याचे सांगितले.

 

या बैठकीत अ‍ॅब्रिज, अदालत एआय, ब्रेनसाइटएआय, क्रेडो एआय, एका केअर, ग्लीन, इनोगल, इनव्हिडिओ, मिको, ओरिजिन, प्रोफेज, रसेन, रुब्रिक, सॅटस्यूर, सुपरनोव्हा आणि सिफा एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रधान सचिव पी. के. मिश्रा, प्रधान सचिव-2 श्री शक्तिकांत दास आणि राज्यमंत्री जितिन प्रसाद उपस्थित होते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target

Media Coverage

India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 एप्रिल 2026
April 06, 2026

India’s Golden Chapter: PM Modi Turns Vision into Records From Ports to People, From Naxal to Naval