पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. "भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि समृद्धी घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ !" असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
एक्स संदेशात पंतप्रधान म्हणतात -:
"माझे कुटुंबीय असणाऱ्या सर्व देशवासीयांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा ! भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि सद्भाग्य घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ !"
देश के अपने सभी परिवारजनों को कार्तिक पूर्णिमा और देव दीपावली की कोटि-कोटि शुभकामनाएं। भारतीय संस्कृति और अध्यात्म से जुड़ा यह दिव्य अवसर हर किसी के लिए सुख, शांति, आरोग्य और सौभाग्य लेकर आए। पावन स्नान, दान-पुण्य, आरती और पूजन से जुड़ी हमारी यह पवित्र परंपरा सबके जीवन को…
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2025


