पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना छठ पूजेच्या संध्या अर्घ्य विधीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी छठी मैय्याला समर्पित असलेली भक्तिगीते देखील सामायिक केली.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी  लिहिले :

"देशभरातल्या आपल्या कुटुंबियांना  महापर्व छठ च्‍या  संध्या अर्घ्य विधीसाठी अनंत शुभेच्छा. या पवित्र काळामध्‍ये  अस्ताला जाणा-या सूर्याला अर्घ्य अर्पित करण्याची परंपरा खूप  वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.  सूर्यदेवाच्या  कृपेमुळे  सर्वांचे  कल्याण व्हावे,सर्वांच्या जीवनात सुख-समृध्‍दी यावी आणि  सर्वांना यश मिळावे, अशी कामना आहे. जय छठी मैय्या !’’

https://m.youtube.com/watch?v=er0EO-Zp904

https://m.youtube.com/watch?v=OrlnX9zM5-k&pp=0gcJCR4Bo7VqN5tD