प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेचा परिवर्तनात्मक प्रभाव पंतप्रधानांनी केला अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी दिन 2026 निमित्त, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेचा सकारात्मक परिणाम होत असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार औषधे मिळावीत याप्रति आमची असलेली वचनबद्धता या उपक्रमातून दिसून येते असे ही मोदी यांनी म्हटले आहे. जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून असंख्य कुटुंबे आरोग्यसेवेच्या खर्चात बचत करत आहेत आणि योग्य उपचार मिळवत आहेत, असेही  मोदी पुढे नमूद केले.

या निमित्ताने पंतप्रधानांनी भारतीय जनऔषधी परियोजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाची झलकही सामायिक केली आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;

“#जन औषधीदिन  2026 निमित्ताने, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेचा सकारात्मक परिणाम झालेल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. हा उपक्रम प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याप्रति आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून, असंख्य कुटुंबे आपल्या आरोग्यसेवेच्या खर्चात बचत करत आहेत आणि योग्य उपचार मिळवत आहेत.”

 

 

“प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या परिवर्तनात्मक प्रभावाची एक झलक.”

#JanAushadhiDiwas2026” 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Pyaaz Khaate Hai, Dimaag Nahi': PM Modi's Jhalmuri Video Breaks The Internet With 100M+ Views

Media Coverage

Pyaaz Khaate Hai, Dimaag Nahi': PM Modi's Jhalmuri Video Breaks The Internet With 100M+ Views
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 एप्रिल 2026
April 21, 2026

Aatmanirbhar Bharat Goes Global: PM Modi Turns India into Manufacturing Superpower & Innovation Powerhouse