आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत. आपल्या अशा प्रेमामुळेच आपल्याला सदैव देशसेवेचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळत असते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश:
शुभेच्छांसाठी आपले खूप खूप आभार @ombirlakota जी. देशवासियांचे कल्याण आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या कामात आमचे सरकार प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही. आपल्या या प्रेमामुळेच तर, मला सदैव देशसेवेचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळत असते.
शुभकामनाओं के लिए आपका बहुत-बहुत आभार @ombirlakota जी। देशवासियों के कल्याण और राष्ट्र के समग्र विकास के लिए हमारी सरकार अपने प्रयासों में कोई कोर-कसर नहीं छोड़ने वाली है। यह आप सबका स्नेह ही है, जो मुझे निरंतर देशसेवा में जुटे रहने के लिए प्रेरित करता रहता है। https://t.co/QZJJONUj2a
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2025


