वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पंतप्रधानांनी मानले आभार

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रपतींना दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“आदरणीय @rashtrapatibhvn जी, आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आपले प्रेरणादायी मार्गदर्शन खूप प्रोत्साहन देणारे आहे. देश आणि देशवासियांप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही.”

 

उपराष्ट्रपतींना दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी कृतज्ञ आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड जी. आपले मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील दृष्टीकोन देखील मला भावतो.”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले आहेत. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ही आपुलकी मला लोकांसाठी अधिक परिश्रम करण्याचे मोठे बळ देते.  

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:

“जनतेचा हा स्नेह विनम्रतेने स्वीकारताना सन्मानित झालो आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. ही आपुलकी मला लोकांसाठी अधिक परिश्रम करण्याचे मोठे बळ देते.  

आज आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण होण्याचा दिवसही  आहे. गेले  100 दिवस लोकाभिमुख आणि विकासाभिमुख निर्णयांच्या मालिकेने परिपूर्ण राहिले, याचा मला आनंद वाटतो, जे विकसित भारत निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देईल.

आज अनेक जणांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्या उर्जेला मी सलाम करतो, आणि त्यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करतो.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
21% YoY rise in engineering exports in June shows sector's resilience amid global challenges: EEPC India Chairman

Media Coverage

21% YoY rise in engineering exports in June shows sector's resilience amid global challenges: EEPC India Chairman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 जुलै 2026
July 14, 2026

From Local Fields to Global Recognition: PM Modi’s ‘Vocal for Local’ is Now Delivering Real Global Respect