पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त संपूर्ण डॉक्टर समुदायाप्रति मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

 पंतप्रधानांनी ट्विट केले:

 “#DoctorsDay निमित्ताने, मी संपूर्ण डॉक्टर समुदायाप्रति मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी प्रतिकूल काळातही डॉक्टर बजावत असलेली सेवा धैर्य, निस्वार्थीपणा आणि लवचिकता यांचे उदाहरण बनली आहे. उपचारांप्रति त्यांचे समर्पण अकल्पनीय आहे; हे समर्पण आपल्या समाजाला आशा आणि शक्ती देते."