पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांचे, गयानाच्या सर्वसाधारण व प्रादेशिक निवडणुकांमध्ये मिळवलेल्या निर्णायक यशाबद्दल अभिनंदन केले आहे. “ भारत-गयाना यांच्यातील बळकट आणि ऐतिहासिक परस्पर जनसंपर्कावर आधारित भागीदारी अधिक भक्कम करण्यास मी उत्सुक आहे,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X या माध्यमावर संदेश लिहिला आहे,
“सर्वसाधारण आणि प्रादेशिक निवडणुकांमध्ये मिळवलेल्या निर्णायक यशाबद्दल मी राष्ट्रपती इरफान अली यांचे अभिनंदन करतो. भारत-गयाना यांच्यातील बळकट आणि ऐतिहासिक परस्पर जनसंपर्कावर आधारित भागीदारी अधिक भक्कम करण्यास मी उत्सुक आहे.”
Heartiest congratulations to President Irfaan Ali on the resounding success in General and Regional elections. I look forward to further strengthening India-Guyana partnership anchored in strong and historical people-to-people ties.@presidentaligy
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2025


