लॉरेन्स वाँग यांनी निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यात असलेल्या घनिष्ठ संबंधांच्या आधारावर निर्माण झालेल्या सशक्त तसेच बहुआयामी भागीदारीवर त्यांनी अधिक भर दिला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“@LawrenceWongST तुम्ही सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. भारत आणि सिंगापूर या देशांतील जनतेमध्ये असलेल्या दृढ संबंधांच्या पायावर हे दोन्ही देश एक सशक्त तसेच बहुआयामी भागीदारी सामायिक करतात. आपल्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी तुमच्यासह एकत्र येऊन काम करत राहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
Heartiest congratulations @LawrenceWongST on your resounding victory in the general elections. India and Singapore share a strong and multifaceted partnership, underpinned by close people-to-people ties. I look forward to continue working closely with you to further advance our…
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2025


