राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये 60 किलोग्रॅम वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल जॅस्मिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की;
"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. जॅस्मिन लॅम्बोरियाने मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले याचा खूप आनंद झाला. तिचे क्रीडाविषयक यश भारतीय मुष्टीयुद्ध क्षेत्राच्या भवितव्यासाठी चांगले आहे. आगामी वर्षांमध्ये सुद्धा ती असेच यश मिळवत राहो हीच शुभेच्छा. #Cheer4India"
Indian athletes at the CWG are excelling in different sports. Glad that Jaismine Lamboria has won a Bronze medal in Boxing. Her sporting success augurs well for the future of Indian boxing. May she keep attaining glory in the coming years. #Cheer4India pic.twitter.com/FLVCuUe0Xg
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2022


