​व्हिएतनाममधील दा नांग इथल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.

​भारताच्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने या अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

​पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके जिंकली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

​महिला कुस्ती संघाने देखील 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

​ग्रीको-रोमन संघाने देखील 8 पदकांसह आत्तापर्यंतची आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे.

या यशाबद्दल त्यांनी ​कुस्तीपटूंचे अभिनंदन केले, तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ​ X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश

आपल्या कुस्तीपटूंची उत्कृष्ट कामगिरी!

​व्हिएतनाममधील दा नांग इथे पार पडलेल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आपल्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

​पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके पटकावली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. महिला कुस्ती संघानेही 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली. ग्रीको रोमन संघाने देखील 8 पदकांसह एकूण पदकसंख्येच्या बाबतीत आपली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली.

​आपल्या कुस्तीपटूंचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s petroleum products’ exports surge 8% in July

Media Coverage

India’s petroleum products’ exports surge 8% in July
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends Raksha Bandhan greetings
August 28, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his warm greetings to the people on the occasion of Raksha Bandhan. Shri Modi wished that this sacred festival brings happiness, prosperity and success to everyone. He also prayed that the bond of love, affection and mutual trust celebrated through Raksha Bandhan remains forever strong and unbreakable.

The Prime Minister posted on X:

रक्षाबंधन की बहुत-बहुत शुभकामनाएं।

यह पावन पर्व आप सभी के जीवन में खुशहाली, समृद्धि और सफलता लेकर आए।

स्नेह, अपनत्व और आपसी विश्वास की डोर सदैव अटूट बनी रहे, यही कामना है।