पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे अभिनंदन केले आहे. "भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत", असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत."
@AndrewHolnessJM
Heartiest congratulations to Dr. Andrew Holness on leading the Jamaica Party to victory for the third consecutive time. Looking forward to deepening India-Jamaica bonds of friendship and further strengthening cooperation between our two countries.@AndrewHolnessJM
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2025


