महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जेजुरी-मोरगाव मार्गावर रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50,000 रुपये मदत त्यांनी जाहीर केली.
पीएमओ इंडियाने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात जेजुरी-मोरगाव मार्गावर रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीने तीव्र दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रति शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना.
मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल . जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
Deeply saddened by the loss of lives due to a road accident on the Jejuri-Morgaon road in Pune, Maharashtra. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) June 19, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each…


