पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापक भीम सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मोदी म्हणाले की, प्रा भीम सिंह जी हे तळागाळातील नेते म्हणून स्मरणात राहतील , त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.
पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले ;
"प्रा. भीम सिंह जी हे तळागाळातील नेते म्हणून स्मरणात राहतील, त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.त्यांचे वाचन खूप चांगले होते आणि ते अभ्यासू होते. त्यांच्याशी झालेला संवाद नेहमी माझ्या आठवणीत राहील. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
Prof Bhim Singh Ji will be remembered as a grassroots leader who devoted his life for the welfare of Jammu and Kashmir. He was very well read and scholarly. I will always recall my interactions with him. Saddened by his demise. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022


