पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल राज्य सरकारने राष्ट्रपतींचा अनादर केल्याची घटना आणि संथाल संस्कृतीप्रती सामान्य वागणूक यांचा जोरदार निषेध केला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, या घटना लज्जास्पद आणि आधी कधीच न घडलेल्या आहेत. लोकशाहीवर आणि आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाला या घटनेचे अत्यंत दुःख झाले आहे.

स्वतः आदिवासी समाजातील असलेल्या राष्ट्रपतींनी या घटनेविषयी व्यक्त केलेले दुःख व संताप देशातील नागरिकांच्या मनाला वेदना देणारे आहे.

मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून राष्ट्रपतींच्या या अवमानाला टीएमसी सरकार जबाबदार आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत पश्चिम बंगाल सरकार बेजबाबदारीने वागत आहे.

राष्ट्रपतींचे पद हे राजकारणापलिकडील आहे या मुद्द्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, या पदाचे पावित्र्य नेहमीच जपले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि टीएमसी पक्षाला सद्बुद्धी लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ माध्यमावर लिहीले आहे की,

“ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि यापूर्वी कधीही न घडलेली आहे. लोकशाही आणि आदिवासींच्या सक्षमीकरणावर विश्वास असणाऱा प्रत्येक जण या घटनेने व्यथित झाला आहे.

स्वतः आदिवासी समुदायातून पुढे आलेल्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलेले दुःख आणि संताप भारतातल्या लोकांसाठी वेदनादायी आहे.

पश्चिम बंगाल सरकारने खरोखरच सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राष्टट्रपतींच्या या अवमानाला त्यांचे प्रशासन जबाबदार आहे.

पश्चिम बंगाल सरकारचे संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या बाबीला इतकी सामान्य वागणूक देणेदेखील तितकेच दुर्दैवी आहे.

राष्ट्रपतीपद राजकारणापलिकडील आहे आणि या पदाचे पावित्र्य नेहमीच जपले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि टीएमसीला सद्बुद्धी लाभो अशी आपण करुया.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi