चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-एफ46 प्रकारात रोहित हूडा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“पुरुषांच्या शॉट पुट-एफ46 क्रीडा प्रकारात रोहित हूडा याची कांस्य पदकाची कमाई आणि या स्पर्धेत त्याने केलेली विलक्षण कामगिरी याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. भविष्यातील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा.”
Huge congratulations to @RohitHo45912288 for his Bronze Medal and outstanding performance in the Men's Shot Put-F46 event. Best wishes for your future endeavours. pic.twitter.com/r1hnc8EcQN
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023


