पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या वेस्ट कामेंग जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांची पर्जन्यजलसंधारणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य सादर करत असल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले :
"अशा प्रकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि विविध मुद्द्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी भारतामधील आणखी अनेक लोक अशा प्रकारचे प्रयत्न करू लागतील, अशी आशा मला वाटते.”
Such efforts are laudatory and they go a long way in spreading awareness on various issues. I hope more people across India undertake such efforts to further the message of water conservation. https://t.co/FVXqoth18p
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2023


