गुंतवणूक आणि व्यावसायिक संधींसाठी एक पोषक केंद्र म्हणून या राज्याच्या क्षमतेचे दर्शन या कार्यक्रमातून घडत आहे : पंतप्रधान
पूर्व भारत देशाच्या विकासामधील ऊर्जावृद्धी करणारे इंजिन आहे, यामध्ये ओदिशाची भूमिका महत्त्वाची आहे : पंतप्रधान
आज भारत कोट्यवधी जनतेच्या आकांक्षांच्या बळावर विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेः पंतप्रधान
ओदिशा खरोखरच असाधारण आहे, ओदिशा आशावादाचे आणि अस्सलपणाचे प्रतीक आहे, ओदिशा ही संधींची भूमी आहे आणि येथील जनतेने असामान्य कामगिरी करण्याची लालसा नेहमीच दाखवली आहे : पंतप्रधान
भारत हरित भवितव्य आणि हरित तंत्रज्ञानावर भर देत आहे : पंतप्रधान
21 व्या शतकातील भारतासाठी, हे युग म्हणजे सर्व काही परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा आणि मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी याविषयीचे आहे : पंतप्रधान
युवा प्रतिभेचे प्रचंड मोठे भांडार आणि संगीत कार्यक्रमांचा चाहता असलेला अतिशय मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने भारतामध्ये जोमाने वृद्धिंगत होणाऱ्या संगीत कार्यक्रमांची अर्थव्यवस्था बनण्याच्या अमाप संभावना आहेत : पंतप्रधान
युवा प्रतिभेचे प्रचंड मोठे भांडार आणि संगीत कार्यक्रमांचा चाहता असलेला अतिशय मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने भारतामध्ये जोमाने वृद्धिंगत होणाऱ्या संगीत कार्यक्रमांची अर्थव्यवस्था बनण्याच्या अमाप संभावना आहेत : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे  “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद  असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.

“पूर्व भारत हे  देशाच्या विकासामधील ऊर्जावृद्धी करणारे इंजिन आहे,यामध्ये ओदिशाची भूमिका महत्त्वाची आहे”,असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.ऐतिहासिक संदर्भातून देखील हे स्पष्ट होत आहे की ज्या काळात भारत जागतिक वृद्धीमध्ये प्रमुख भूमिका बजावत होता, त्यावेळी पूर्व भारताची कामगिरी उल्लेखनीय होती. त्या वेळी पूर्व भारतात महाकाय उद्योग केंद्रे, बंदरे आणि व्यापारी केंद्रे होती आणि त्यामध्ये ओदिशाचा सहभाग उल्लेखनीय होता, असे मोदी यांनी नमूद केले.“ओदिशा  हे आग्नेय आशियायी व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते आणि तेथील बंदरे भारताची प्रवेशद्वारे होती, असे पंतप्रधान म्हणाले.ओदिशामध्ये आजही बाली यात्रा साजरी केली जाते,असे त्यांनी सांगितले. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच भारताला दिलेल्या भेटीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचे असे शब्द होते की त्यांच्या डीएनएमध्ये बहुधा ओदिशाचे अंश असावेत.ओदिशाला आग्नेय आशियाशी जोडणाऱ्या संबंधांचा वारसा आहे,असे पंतप्रधान म्हणाले.ओदिशाने आता 21 व्या शतकात त्या वैभवशाली वारशाचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी अलीकडेच ओदिशाला भेट दिली आणि ओदिशाबरोबर असलेल्या नातेसंबंधांविषयी सिंगापूर फारच उत्साही होते,असे त्यांनी नमूद केले.असियान देशांनीही ओदिशासोबत व्यापार आणि पारंपरिक संबंध बळकट करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. स्वातंत्र्यानंतर यापूर्वी कधीही नव्हत्या इतक्या अमाप संधी या भागात उदयाला येत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.ओदिशाच्या विकासाच्या प्रवासात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले आणि त्यांना असे आश्वासन दिले की त्यांची गुंतवणूक यशाची नवी शिखरे सर करेल.

 

“कोट्यवधी जनतेच्या आकांक्षांच्या बळावर भारत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे”,असे मोदी म्हणाले आणि एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बरोबरच देशाचे सामर्थ्य असलेल्या ऍस्पिरेशन ऑफ इंडियाचे देखील निदर्शक आहे. लोकांच्या गरजांची जेव्हा पूर्तता होते तेव्हा आकांक्षाची वाढ होते आणि गेल्या दशकात कोट्यवधी नागरिकांचे सक्षमीकरण झाले आहे, ज्याचा लाभ देशाला झाला आहे. या आकांक्षांचे प्रतिनिधित्व ओदिशा करत आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ओदिशा म्हणजे असाधारण असून आशावाद आणि नव्या भारताच्या अस्सलपणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

ओदिशामध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत आणि तिथले लोक नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उत्साही असतात असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये ओदिशातील लोकांचे कौशल्य, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा पाहिला असल्याचा वैयक्तिक अनुभवही उपस्थितांशी सामायिक केला. ओदिशामध्ये नवीन संधी निर्माण झाल्याने, राज्य लवकरच विकासाची अभूतपूर्व उंचीवर पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ओदिशाच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुकही केले. आता ओदिशा हे अन्न प्रक्रिया, पेट्रोकेमिकल्स, बंदर - आधारित विकास, मत्स्यव्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, पर्यटन, खाणकाम आणि हरित ऊर्जा यासह विविध उद्योग क्षेत्रांमध्ये भारतातील आघाडीच्या राज्यांपैकी एक बनू लागले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

 

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत असल्याचेही पंतप्रधानां अधोरेखित केले. आता पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा मैलाचा दगड फार दूर नाही असे ते म्हणाले. गेल्या दशकभरात उत्पादन क्षेत्रातली भारताची ताकद ठळकपणे दिसून आली आहे असे त्यांनी सांगितले. नवोन्मेषाधारीत सेवा क्षेत्र आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे दोन महत्वाचे स्तंभ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. केवळ कच्च्या मालाच्या निर्यातीवर देशाची झपाट्याने प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणूनच नवा दृष्टीकोन अवलंबत या संपूर्ण परिसंस्थेचा कायापालट केला जात असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. यापूर्वी खनिजांचे उत्खनन करून, उत्पादन निर्मिती आणि मूल्यवर्धना परदेशात पाठवली जात आणि नंतर निर्माण झालेली उत्पादने भारतात परत येत. मात्र आता भारत ही संपूर्ण परंपराच बदलत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सागरी खाद्यान्नही इतर देशांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी पाठवण्याची परंपरा होती, मात्र आता ही परंपराही बदलत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ओदिशातील संसाधनांशी संबंधित उद्योग इथे राज्यातच स्थापन व्हायला हवेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025 म्हणजे हा संकल्प साकार करण्याचे साधन असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

आत्ताचे जग हे शाश्वत जीवनशैलीवर अधिकाधिक भर देत असून,हरित भविष्याकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यामुळे आता हरित रोजगारांची शक्यताही प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याता काळानुसार असलेला मागण्या आणि गरजांशी जुळवून आपल्याला जूळवून घ्यावे लागेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. त्याअनुषंगानेच आता भारत हा  सौर, पवन, जलविद्युत आणि हरित हायड्रोजनसह हरित तंत्रज्ञान आणि हरित भविष्यावर भर देऊ लागला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विकसित भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाहा बळ मिळेल असे त्यांनी अधोरेखित केले.ओदिशामध्ये या संदर्भात प्रचंड क्षमता आहेत, आणि आता देशाने राष्ट्रीय स्तरावरील हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा मोहिमाही सुरू केल्या असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ओदिशामध्ये नवीकरणीय ऊर्जा उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत आणि हायड्रोजन ऊर्जा उत्पादनासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली

 

ओडिशात हरित ऊर्जेबरोबरच पेट्रो आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राचा विस्तार करण्यासाठीही उपक्रम आखले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पारादीप आणि गोपालपूर येथे समर्पित औद्योगिक पार्क आणि गुंतवणूक क्षेत्र विकसित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यातून या क्षेत्राची गुंतवणुक आकर्षित करण्याची लक्षणीय क्षमता दिसून येते असे ते म्हणाले. ओडिशाच्या विविध प्रदेशांची क्षमता विचारात घेऊन, त्याप्रमाणे जलद गतीने निर्णय घेत, नवी परिसंस्था विकसित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा सरकारचे अभिनंदनही केले.

एकविसावे शतक हे भारतासाठी परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा आणि बहु आयामी - बहुस्तरीय दळणवळणीय जोडणीचे शतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.आता भारतात ज्या प्रमाणात आणि वेगाने विशिष्ट गरजांना अनुसरून पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहे, त्यामुळे आपला देश गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम आणि पसंतीचे ठिकाण बनू लागला असल्याचे ते म्हणाले. मालवाहतुकीच्या समर्पित कॉरिडॉरमुळे देशाचा पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा भाग परस्पराशी जोडला जात आहे, यामुळे पूर्वी केवळ जमिनीने जोडल्या गेलेल्या प्रदेशांना आता सागरी मार्गांचा वापर करण्यासाठी समुद्रापर्यंत जलदगतीने पोहोचण्याची सोय उपलब्ध झाली आहे ही बाबही पंतप्रधानांनी नमूद केली. देशभरात वापराच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधांनी पूर्णतः सज्ज असलेली असंख्य औद्योगिक शहरे उभारली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ओदिशामध्येही अशाच स्वरुपाच्या संधीचा विस्तार केला जात असून, त्यादृष्टीनेच राज्यात रेल्वे आणि महामार्गा सेवेचे जाळे विस्तारण्याशी संबंधित हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ओदिशातील उद्योगांच्या दळणवळणीय खर्चात घट व्हावी यासाठी, सरकार बंदरांना औद्योगिक क्लस्टरसोबत जोडत आहे आणि विद्यमान बंदरांचा विस्तार, त्याच बरोबरीने सध्या अस्तित्वात असलेल्या बंदरांचा विस्तार आणि नवीन बंदरे उभारण्याचे कामही समांतरपणे सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी केले. निळी अर्थव्यवस्था (Blue Economy) अर्थात समुद्र आणि जलस्रोतांवरआधारित अर्थव्यवेच्या बाबतीत ओदिशा हे देशातल्या आघाडीच्या राज्यांपैकी एक राज्य बनेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

 

झपाटयाने बदलणाऱ्या जगात जागतिक पुरवठा साखळीतील आव्हाने ओळखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि विस्कळीत तसेच आयात-आधारित पुरवठा साखळींवर भारत अवलंबून राहू शकत नाही यावर भर दिला. त्यामुळे जागतिक चढउतारांचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतातच  एक मजबूत पुरवठा आणि मूल्य साखळी तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ही जबाबदारी सरकार आणि उद्योग या दोघांची आहे असे त्यांनी अधोरेखित केले. मोदी यांनी  उद्योगांना एमएसएमई आणि युवा स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याचे आवाहन करतानाच विकासासाठी संशोधन आणि नवोन्मेषच्या महत्त्वावर भर दिला. सरकार विशेष निधी तसेच  इंटर्नशिप आणि कौशल्य विकासासाठी पॅकेजच्या माध्यमातून देशात एक ऊर्जाशील  संशोधन परिसंस्था निर्माण करत आहे. मोदी यांनी  उद्योगांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी तसेच  सरकारबरोबर सहकार्य  करण्यासाठी प्रोत्साहित केले. मजबूत संशोधन परिसंस्था आणि कुशल युवाशक्तीचा   उद्योगाला थेट फायदा होईल यावर भर देऊन मोदी यांनी उद्योग भागीदारांना आणि ओदिशा सरकारला, ओदिशाच्या आकांक्षांना अनुरूप अशी आधुनिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले जेणेकरून युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील. ते म्हणाले की, यामुळे ओदिशात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील आणि परिणामी राज्यात समृद्धी, सामर्थ्य आणि प्रगतीला चालना मिळेल. जगभरातील लोक भारताबद्दल अधिक  समजून आणि जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत असे  पंतप्रधान म्हणाले. भारताबाबत जाणून घेण्यासाठी हजारो वर्षांचा वारसा आणि इतिहास असलेले ओदिशा हे एक उत्तम ठिकाण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की,या राज्यात श्रद्धा, आध्यात्म, जंगले, पर्वत आणि समुद्र या सर्वांचे  अनोखे मिश्रण एकाच ठिकाणी पहायला मिळते. ओदिशा हे विकास आणि वारशाचे मॉडेल आहे असे वर्णन त्यांनी केले आणि ओदिशामध्ये जी -20 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच आणि कोणार्क सूर्य मंदिराचे चाक हे मुख्य कार्यक्रमाचा एक भाग बनवले होते याचा उल्लेख केला.

ओडिशाला 500 किलोमीटर लांब समुद्रकिनारा  आणि 33% हून अधिक वनाच्छादित क्षेत्र लाभले असून निसर्ग पर्यटन आणि साहसी पर्यटनासाठी अफाट संधी असलेल्या ओदिशाच्या पर्यटन क्षमतेचा शोध घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. "वेड इन इंडिया" आणि "हील इन इंडिया"वर भारत प्रामुख्याने भरदेत असल्याचे सांगितले  आणि ओदिशाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण या उपक्रमांसाठी खूपच पूरक  असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतामध्ये 'परिषद पर्यटन' साठी लक्षणीय क्षमता असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, दिल्लीतील भारत मंडपम आणि यशोभूमी सारखी ठिकाणे या क्षेत्रासाठी प्रमुख केंद्रे बनत आहेत.त्यांनी कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्राकडेही लक्ष वेधले. संगीत, नृत्य आणि कथाकथनाचा समृद्ध वारसा आणि सांगीतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणारा  मोठा युवा प्रेक्षक वर्ग लक्षात घेता  भारतामध्ये कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेसाठी अमाप संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

गेल्या दशकात ‘लाईव्ह इव्हेंट्स’ घेण्‍याचा कल वाढला असून त्याची मागणीही वाढली आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुंबई आणि अहमदाबाद येथे अलिकडेच झालेल्या ‘कोल्डप्ले कॉन्सर्ट’चा दाखला देवून,  भारतात ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ चे प्रचलन वाढत असल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले. जागतिक स्तरावरील प्रमुख कलाकार भारताकडे आकर्षित होत आहेत आणि कॉन्सर्टच्या  अर्थव्यवस्थेमुळे  पर्यटनाला चालना मिळते,  त्याचबरोबर असंख्य नोकऱ्या निर्माण होतात,  यावर  पंतप्रधान मोदी यांनी  यावर भर दिला. त्‍यांनी यावेळी राज्ये आणि खाजगी क्षेत्राला ‘कॉन्सर्ट’ अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यामध्ये कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कलाकारांना सुसज्ज करणे , सुरक्षा आणि इतर व्यवस्थांचा समावेश आहे;   या क्षेत्रात  नवीन संधी निर्माण होत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी पुढील महिन्यात भारत प्रथमच जागतिक दृक श्राव्‍य  आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) आयोजित करणार असल्याचे नमूद केले. या  महत्त्वाच्या  कार्यक्रमामध्‍ये  जगासमोर भारताच्या  सर्जनशील शक्ती प्रदर्शन केले जाईल,  यावर त्यांनी भर दिला. अशा कार्यक्रमांमुळे महसूल निर्माण होतो आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लागतो, असेही त्यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची ओडिशामध्ये प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.

“विकसित भारताच्या उभारणीत ओडिशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते”,यावर  पंतप्रधानांनी भर दिला.ओडिशाच्या लोकांनी समृद्ध राज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे,हे त्यांनी अधोरेखित केले.ओडिशाबद्दल आपल्याला  प्रेम व्यक्त वाटते, असे सांगून ते म्हणाले, पंतप्रधान म्हणून आपण जवळजवळ 30 वेळा राज्याला भेट दिली आणि ओडिशातील  बहुतेक जिल्ह्यांनाही  भेट दिली आहे. त्यांनी ओडिशाच्या क्षमतेवर आणि तेथील लोकांवर विश्वास असल्याचे सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की सर्व भागीदारांनी केलेल्या गुंतवणूकीमुळे त्यांचे व्यवसाय आणि ओडिशाची प्रगती नवीन उंचीवर जाईल. त्यांनी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपती, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान,  अश्विनी वैष्णव हे कार्यक्रमात उपस्थित होते.

पार्श्‍वभूमी -

उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025 ही एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद आहे. या परिषदेचे  ओडिशा सरकारद्वारे आयोजन केले आहे. परिषदेचा  उद्देश पूर्वोदय व्हिजनचा तसेच भारतातील एक अग्रगण्य गुंतवणूक स्थान  आणि औद्योगिक केंद्र म्हणून राज्याला स्थान प्राप्त करून देणे असा आहे.

पंतप्रधानांनी आज  मेक इन ओडिशा प्रदर्शनाचे उद्घाटनही केले.या प्रदर्शनामध्‍ये  एक गतिमान औद्योगिक परिसंस्था विकसित करण्यासाठी  राज्याने केलेल्‍या  कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही परिषद 28 आणि 29 जानेवारी, 2025 अशी  दोन दिवस चालणार आहे.उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणून  ओडिशा  हे सर्वांच्या पसंतीचे गुंतवणूक स्थान म्हणून देत असलेल्या संधींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ही परिषद काम करणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये विविध कंपन्यांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि नेत्यांच्या गोलमेज परिषदा होतील तसेच क्षेत्रीय सत्रे, बी2बी बैठका आणि धोरणात्मक चर्चा आयोजित केल्या जातील. परिषदेमुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा लक्ष्यित सहभाग सुनिश्चित होण्‍यास मदत होणार आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 44,544 crore capex loans to states so far in FY27

Media Coverage

Centre releases Rs 44,544 crore capex loans to states so far in FY27
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses anguish over the loss of lives due to tunnel collapse in Namchi, Sikkim
July 21, 2026
PM announces ex-gratia from PMNRF

Prime Minister Shri Narendra Modi today expressed anguish over the loss of lives due to the collapse of an under-construction tunnel in Namchi, Sikkim. He extended his deepest condolences to the bereaved families and prayed that those injured recover at the earliest.

The Prime Minister announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. Shri Modi stated that the injured would be given Rs. 50,000.

In a post on X, the Prime Minister shared:

"Anguished by the loss of lives due to the collapse of an under-construction tunnel in Namchi, Sikkim. I extend my deepest condolences to the bereaved families. I pray that those injured recover at the earliest.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi"