पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुखदेव सिंग धिंडसा जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "ते एक प्रगल्भ, उत्तुंग राजकारणी होते आणि सार्वजनिक सेवेप्रति त्यांची अढळ बांधिलकी होती. त्यांचा नेहमीच पंजाब, तेथील लोक आणि संस्कृतीशी मूलभूत संबंध होता", असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
"श्री सुखदेव सिंग धिंडसा जी यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते प्रगल्भ आणि सार्वजनिक सेवेसाठी अढळ बांधिलकी असलेले एक उत्तुंग राजकारणी होते. त्यांचा नेहमीच पंजाब, तेथील लोक आणि संस्कृतीशी मूलभूत संबंध होता. त्यांनी ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकास यासारख्या मुद्द्यांवर लढा दिला. त्यांनी नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी काम केले. मला त्यांना अनेक वर्षे जाणून घेण्याचे, विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष संवाद साधण्याचे सौभाग्य मिळाले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या आप्तस्वकीयांप्रति माझ्या सहवेदना."
The passing of Shri Sukhdev Singh Dhindsa Ji is a major loss to our nation. He was a towering statesman with great wisdom and an unwavering commitment to public service. He always had a grassroots level connect with Punjab, its people and culture. He championed issues like rural… pic.twitter.com/zxDahJrNBO
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2025