तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर केली असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत स्वरुपात दिले जाणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे :
“विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल जाणून अत्यंत दु:ख झाले. या दुर्दैवी घटनेत ज्यांचे दुःखद निधन झाले आहे, त्यांच्या प्रियजनांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जे जखमी झाले आहेत ते सर्व लवकर आणि पूर्ण बरे व्हावेत, अशी माझी सदिच्छा आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत स्वरुपात दिले जाणार आहेत. PM @narendramodi
It is with a heavy heart that I learnt about a mishap at a firecracker factory in Virudhunagar district. During this difficult time, my thoughts are with the loved ones of those who have tragically passed away. I wish a swift and full recovery for all who have been injured.
— PMO India (@PMOIndia) February 17, 2024
An…


