नवी दिल्ली येथे आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रतिनिधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की,
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे यजमानपद मिळाल्याचा भारताला अभिमान आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. ही स्पर्धा मानवी जिद्द आणि निर्धार यांचा उत्सव आहे. या स्पर्धेमुळे जगभरात अधिक समावेशक, प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळो.
India is proud to be hosting the World Para Athletics Championships 2025 in Delhi, which commences today. A warm welcome and best wishes to all participants. This tournament celebrates human determination and spirit. May this tournament inspire a more inclusive and vibrant… pic.twitter.com/SRa6p2z0sO
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025


