PM Narendra Modi to visit Bihar, attend centenary celebrations of Patna University
PM Modi to lay foundation stone for 4 National highway projects & 4 projects under Namami Gange in Bihar

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात ते विद्यार्थ्यांना संबोधित करतील. त्यानंतर मोकामा येथे पंतप्रधान नमामी गंगे प्रकल्पाच्या चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे भूमीपूजन करतील. तसेच चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते होईल. या सर्व प्रकल्पांसाठी 3,700 कोटी  रुपये खर्च अपेक्षित आहे. इथेही पंतप्रधान एका सभेत भाषण करतील.

या सांडपाणी प्रकल्पांमध्ये बेऊर, कर्मालीचाक आणि सईदपूर इथल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे सांडपाणी प्रक्रिया क्षमता 120 एमएलडी पर्यंत वाढेल. सध्या बेऊर येथे ही क्षमता 20 एमएलडी इतकी आहे.

चार महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजनही यावेळी होईल. यात औंता-सीमारीया, बख्तीयारपूर- मोकामा, महेशखुंट-सहरसा-पुर्णिया, बिहारशरीफ-बारबिघा-मोकामा अशा महामार्गांचा समावेश आहे.  

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions