पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिरात आणि ओमानच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान मी पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान दौऱ्यावर आहे. 2015 पासून आखाती आणि पश्चिम आशियाई भागाला पाचवी भेट देताना मला आनंद होत आहे. परराष्ट्र विभागात या भागाला आमचे प्राधान्य आहे. इथल्या देशांशी आमचे बहुआयामी संबंध आहेत.

जॉर्डनमार्गे आल्यानंतर 10 फेब्रुवारीला पॅलेस्टाईन दौरा सुरू होईल. या प्रवासासाठी मी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांचा आभारी आहे. 9 फेब्रुवारीला अम्मान येथे त्यांच्या भेटीसाठी मी उत्सुक आहे.

भारतीय पंतप्रधानांची ही पहिली पॅलेस्टाईन भेट असेल. राष्ट्रपती महंमद अब्बास यांच्या समवेतच्या चर्चेसाठी मी उत्सुक असून पॅलेस्टिनची जनता आणि पॅलेस्टाईनच्या विकासासाठी भारताच्या कटिबद्धतेचा मी पुनरुच्चार करतो.

संयुक्त अरब अमिरातीला मी 10-11 फेब्रुवारीला भेट देत आहे, ऑगस्ट 2015 नंतर मी येथे पुन्हा भेट देत आहे. ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात वेगवान सहकार्य असणारा संयुक्त अरब अमिरात हा आमचा मौल्यवान भागीदार आहे. या क्षेत्रातली आमची प्रगती आणि इतर मुद्यांवर शेख महंमद बिन रशीद अल मकतुम आणि अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांच्याबरोबरच्या भेटीत चर्चा करणार आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाच्या निमंत्रणावरुन मी सहाव्या जागतिक सरकार परिषदेला दुबईत संबोधित करणार आहे. भारत येथे सन्माननीय अतिथी देश म्हणून उपस्थित राहणार आहे.

याच दिवशी दुबईत. मी, अरब आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या अग्रगण्य कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून भारतातल्या अमाप आर्थिक संधी आणि व्यापार सहयोगाला चालना देण्यासाठी एकत्रितपणे आणखी काय करता येईल यावर चर्चा करणार आहे.

आमच्यासमवेत उत्तम संबंध असलेला ओमान हा आमचा घनिष्ट सागरी शेजारी आहे. ओमानचे सुलनात आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी मी चर्चा करणार आहे. भारतासमवेत आर्थिक आणि व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ओमानमधल्या आघाडीच्या उद्योजकांशीही मी संवाद साधणार आहे. पंतप्रधान या नात्यानं येथे 11-12 फेब्रुवारीला माझी पहिली भेट आहे. भारत आणि ओमान यांच्यात शतकानुशतके संबंध आहेत.

11 फेब्रुवारीला संध्याकाळी मी ओमानचे सुलतान यांची भेट घेत आहे. मंत्रिमंडळाचे मंत्री सय्यद फहद बिन महंमद अल सईद आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार बाबींचे उपपंतप्रधान सय्यद असाद बिन तारीक अल सईद यांचीही भेट घेणार आहे. द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्याबरेाबरच आपले पारंपारिक दृढ संबंध अधिक वृद्धींगत करण्याचा आढावाही या चर्चेदरम्यान घेण्यात येईल.

12 फेब्रुवारीला ओमानमधल्या नामांकित उद्योजकांशी मी संवाद साधणार असून भारताबरोबर दृढ आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक विकसित करण्याविषयी यावेळी चर्चा होईल.

ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीत वास्तव्य करणाऱ्या मोठ्या भारतीय समुदायाची भेट घेण्याची संधीही मला लाभणार आहे. आखाती भागात व दशलक्षपेक्षा अधिक भारतीय राहतात त्यापैकी एक तृतीयांश केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्येच राहतात.

हा भारतीय समुदाय भारत आणि आखाती देश यामधला मैत्रीचा दुवा आहे. यजमान देशाची प्रगती आणि भरभराट यामध्येही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. पश्चिम आशिया आणि आखाती देश यांच्याशी वाढते संबंध या भेटीद्वारे अधिक दृढ करण्याची मी आशा करतो.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI gets festive boost: Digital payments hit a record 24.51 billion transactions in August

Media Coverage

UPI gets festive boost: Digital payments hit a record 24.51 billion transactions in August
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives
September 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives.

The Prime Minister wrote on X;

"अभयस्यैव यो दाता तस्यैव सुमहत्फलम् ।

न हि प्राणसमं दानं त्रिषु लोकेषु विद्यते ॥"

Whoever takes away people's fear receives great blessings, and in all three worlds, there is no greater gift than saving a life.