नेपाळ दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन पुढीलप्रमाणे :

 “मी 30 आणि 31 ऑगस्ट हे दोन दिवस काठमांडू येथे जात आहे. तिथे होणाऱ्या बिमस्टेक परिषदेत मी सहभागी होणार आहे. 

शेजारी राष्ट्रांबाबत भारताचे सर्वोच्च प्राधान्य आणि दक्षिण-पूर्व आशियातील सर्व राष्ट्रांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याप्रती भारताची कटिबद्धता या परिषदेतील सहभागातून अधोरेखित होणार आहे.

या परिषदेत, बिमस्टेक समूहातील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधीनींशी  मी  चर्चा करणार असून, देशादेशांमधील प्रादेशिक सहकार्य समृद्ध करणे, व्यापारी संबंध वाढवणे आणि बंगालच्या उपसागरातील प्रदेशात शांतता तसेच समृद्धी निर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न  करणे  यावर  प्रामुख्याने चर्चा होईल.

यावर्षीच्या परिषदेची संकल्पना, “शांत, समृद्ध आणि शाश्वत अशा बंगालच्या उपसागराकडे वाटचाल” अशी असून, यातून सर्व सदस्य देशांचे सामायिकी हितसंबंध,आकांक्षा यांची पूर्ती आणि आव्हानांचा सामना करण्यास या परिषदेतून मदत होईल.

बिमस्टेक परिषदेतील निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रगतीच्या दिशेने या चौथ्या परिषदेतही यशस्वी आणि फलदायी चर्चा होईल, ज्यातून शांत आणि समृद्ध प्रदेशकाची बांधणी करता येईल, असा मला विश्वास वाटतो.

बिमस्टेक परिषदेच्या निमित्ताने, मला बांगलादेश, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

त्याशिवाय, नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचीही मी भेट घेणार असून माझ्या मी 2018 ला झालेल्या नेपाळ दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.

यावेळी पंतप्रधान ओली यांच्यासह पशुपतिनाथ मंदिर परिसरात नेपाळ-भारत मैत्री धर्मशाळेचे उद्‌घाटन करण्याची संधी मला मिळणार आहे.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The Bishkek Balancing Act: How India’s dual engagements define its strategic autonomy

Media Coverage

The Bishkek Balancing Act: How India’s dual engagements define its strategic autonomy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the qualities of a truly wise person
September 01, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the qualities of a truly wise person.

The Prime Minister wrote on X;

"यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे।

कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते॥"

A truly wise person is one whose plans and actions remain hidden from others until they are completed. Such a disciplined, discerning and thoughtful person is rightly regarded as truly wise.