शेअर करा
 
Comments
Our constant endeavour is to ensure affordable healthcare to every Indian: PM
To ensure the poor get access to affordable medicines, the Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojna has been launched: PM
The Government of India has reduced prices of stents substantially. This is helping the poor and the middle class the most: PM
Swachh Bharat Mission is playing a central role in creating a healthy India: PM

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना आणि केंद्र सरकारच्या इतर आरोग्य सेवांच्या देशभरातीललाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्यामाध्यमातूनपंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीआजसंवादसाधला. सरकारीयोजनांच्याविविधलाभार्थींशीव्हिडीओब्रिजच्यामाध्यमातूनपंतप्रधानांनीसंवादसाधण्याचीहीपाचवी वेळआहे.

आरोग्य सेवा आणि चांगले आरोग्य यांचे महत्व विषद करतांना आरोग्य हा, सर्व प्रकारचे यश आणि समृद्धीचा पाया आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा देशातील 125 कोटी नागरिक निरोगी असतील तेव्हाच देश खऱ्या अर्थाने महान आणि आरोग्यपूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

आजारांमुळे कुटुंबांवर, विशेषत: गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांवर मोठे आर्थिक ओझे लादले जाते, त्याचबरोबर सामाजिक-आर्थिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या आरोग्यसेवा मिळतील, याची खातरजमा सरकारने केली पाहिजे. गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाला परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना सुरु केल्याचेपंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकारने देशभरात 3600 जनौषधी केंद्रे सुरु केली असून, तेथे 700 पेक्षा जास्त औषधे परवडण्याजोग्या दरात उपलब्ध आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किमती, बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50 ते 90 टक्के कमी आहेत. नजिकच्या काळात देशातील जनौषधी केंद्रांची संख्या 5000 पर्यंत वाढवणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यापूर्वी नागरिकांना स्टेंट खरेदी करण्यासाठी अनेकदा मालमत्ता विकावी लागत असे किंवा गहाण ठेवावी लागत असे, आता मात्र सरकारने गरीब आणि मध्यम वर्गीय रुग्णांच्या सोयीसाठी स्टेंटच्या दरात मोठी घट केली आहे. हृदयासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटची किंमत 2 लाख रुपयांवरुन 29 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

गुडघेप्रत्यारोपणासाठी होणारा खर्चही सरकारने 60 ते 70 टक्के कमी केला आहे. या शस्त्रवक्रियेसाठी आधी अडीच लाख रुपये खर्च येत असेल. आता मात्र हा खर्च 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. देशात दरवर्षी गुडघे प्रत्यारोपणाच्या सुमारे एक ते दीड लाख शस्त्रक्रिया होतात. हे प्रमाण लक्षात घेऊन गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा नागरिकांचा 1500 कोटी रुपयांचा खर्च कमी झाला आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने देशातील 500 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सव्वा दोन लाख रुग्णांसाठी 22 लाख पेक्षा जास्त डायलिसिस सत्रे घेतली. मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून 528 जिल्ह्यांमधील 3.15 कोटी बालके आणि 80 लाख गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले. रुग्णांसाठी अधिक खाटा, अधिक रुग्णालये आणि अधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने 92 वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली असून, एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी संख्येत 15 हजारांनी वाढ केली आहे.

आरोग्यसेवा सहज आणि परवडण्याजोग्या दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारने आयुषमान भारत योजना सुरु केली आहे. या आयुषमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे. स्वस्थ भारत निर्माण करण्याच्या कामी ‘स्वच्छ भारत मोहिम’ मध्यवर्ती भूमिका पार पाडत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील 3.5 लाख गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली आहेत आणि स्वच्छतेची व्याप्ती 38 टक्के वाढली आहे.

पंतप्रधानांशी संवाद साधतांना लाभार्थींनी, प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेमुळे औषधांच्या किंमती कमी झाल्या असून, औषधे परवडत असल्याचे आवर्जुन सांगितले. स्टेंट आणि गुडघे प्रत्यारोपणासाठीचा खर्च कमी झाल्यामुळे दिलासा मिळाल्याची भावना लाभार्थींनी व्यक्त केली.

स्वस्थ देशाच्या उभारणीसाठी नागरिकांनी योगाला जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी जनतेला केले.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Nine years of Modi govt's transformative foreign policy

Media Coverage

Nine years of Modi govt's transformative foreign policy
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
We have strived to uphold the dignity and enhance the livelihoods of India's poorest: PM
May 30, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has shared a creative highlighting numerous initiatives that have transformed millions of lives over the past 9 years.

The Prime Minister tweeted;

“Over the past 9 years, we have strived to uphold the dignity and enhance the livelihoods of India's poorest. Through numerous initiatives we have transformed millions of lives. Our mission continues - to uplift every citizen and fulfill their dreams.”